Indian Railways: रेल्वेचं रिझर्व्हेशन मिळत नाही ? कन्फर्म तिकीटासाठी IRCTCच्या 'या' याेजनेचा लाभ घ्या

सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढते, पण अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळवणं हेही मोठं आव्हान असतं.
Railway News
Railway NewsSaam tv
Published On

Indian Railways : सणांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढते, पण अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये (Railway) कन्फर्म तिकीट मिळवणं हेही मोठं आव्हान असतं. या समस्येवर काही उपाय म्हणून, रेल्वेची एक योजना आहे विकल्प योजना.

ट्रेनमध्ये रिजर्वेशन मिळत नाही?

आजकाल तिकीट बुकिंगसाठी ऑनलाइन बुकिंगचा वापर खूप वाढला आहे. परंतु ऑनलाइन बुकिंगवर तिकीट कन्फर्म न झाल्यास ते रद्द केले जाते आणि भाडे परत केले जाते. अशा परिस्थितीत लोकांना कुठेतरी जाण्याचा बेत रद्द करावा लागतो. ऑनलाइन बुकिंगद्वारे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढवण्यासाठी विकल्प योजनाचा वापर करा.

Railway News
Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? आज जामीन अर्जावर सुनावणी

काय आहे विकल्प योजना?

ऑनलाइन बुकिंगसाठी विकल्प योजना वापरली जाते. याद्वारे तिकीट खरेदी करण्यासाठी एकापेक्षा जास्त ट्रेन निवडता येतील. त्यामुळे एका ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्म न झाल्यास दुसऱ्या ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्म होण्याची अपेक्षा वाढते. रेल्वेने पर्यायी ट्रेन निवास योजनेला विकल्प योजना असे नाव दिले आहे.

तिकीट मिळविण्यासाठी विकल्प योजना अशी करते मदत ?

वेटिंग तिकीट ऑनलाइन बुक करताना, VIKALP पर्याय भरण्यास सांगितले जाते. या पर्यायामध्ये, ज्या ट्रेनमध्ये तुम्हाला वेटिंग तिकीट मिळाले आहे, त्याव्यतिरिक्त इतर ट्रेनचीही निवड करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही बुक केलेले तिकीट कन्फर्म नसेल, तर तुम्ही निवडलेल्या इतर ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळवू शकता. यासाठी तुम्ही एकूण 7 पर्याय निवडू शकता. मात्र, ते ट्रेन आणि सीटच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.

IRCTC च्या मते, तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बुकिंग केले आहे ती ट्रेन सुटल्यापासून ७२ तासांच्या आत तुम्हाला पर्यायी ट्रेनमध्ये ट्रान्सफर केले जाईल. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष गाड्याही चालवल्या जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com