Learn about the railway rules regarding whether you can travel on another train on the same ticket after missing a train. saam tv
बिझनेस

Railways Rule: जर ट्रेन चुकली तर त्याच तिकिटावर दुसऱ्या गाडीनं प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम?

Railway Rules: जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला काही रेल्वे नियमांची माहिती असायला हवी. जर तुमचे तिकीट कन्फर्म असेल आणि तुमची ट्रेन चुकली, तर तुम्ही त्या तिकिटाचा वापर करून दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्याचे उत्तर जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • मेल-एक्सप्रेस, सुपरफास्ट, राजधानी आणि वंदे भारत यासारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये जनरल तिकिटे वैध नसतात.

  • जर तुमच्याकडे सामान्य तिकीट असेल तर तुम्ही दुसऱ्या गाडीमधून प्रवास करू शकतात.

  • आरक्षण तिकिटाचा परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला टीडीआर दाखल करावा लागतो.

बहुतेक लोक प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देशातील बहुतेक लोक ट्रेनचा पर्याय निवडतात. पण कधी कधी काहींची ट्रेन चुकत असते. स्टेशनवर पोहोचण्यास वेळ झाला तर ट्रेन चुकत असते. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, आपण त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकतो का? आपल्या तिकिटाचे पैसे वाया गेले का? याच प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊ.

ट्रेन चुकली तर काय करावे?

ट्रेन चुकणे ही एक कॉमन गोष्ट झालीय. पण अशा परिस्थितीत पहिला प्रश्न उद्भवतो तो म्हणजे तिकीट परत मिळेल का. दुसरे म्हणजे, तेच तिकीट दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी वापरता येईल का. रेल्वेच्या नियमांनुसार, हे तुमच्याकडे असलेल्या तिकिटाच्या प्रकारावर अवलंबून असते. जर तुमच्याकडे सामान्य तिकीट असेल तर तुम्ही त्याच श्रेणीतील इतर कोणत्याही ट्रेनमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करू शकता.

पण जर तुम्हाला इतर कोणत्याही श्रेणीतील ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. मेल-एक्सप्रेस, सुपरफास्ट, राजधानी आणि वंदे भारत यासारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये जनरल तिकिटे वैध नसतात. जर तुम्ही अशा गाड्यांमध्ये सामान्य तिकिटावर प्रवास केला तर टीटीई तुम्हाला डब्ल्यूटी प्रवासी मानू शकतो आणि दंड आकारू शकतो.

जर तुमच्याकडे आरक्षण तिकीट असेल तर?

जर तुमच्याकडे आरक्षण तिकीट असेल आणि तुमची ट्रेन चुकली तर तुम्ही त्या तिकिटाचा वापर करून दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकत नाही. जर तुम्ही दुसऱ्या गाडीतून प्रवास करू लागलात आणि पकडले गेलात, तर टीटीई तुम्हाला तिकीट नसलेला प्रवासी समजले आणि नियमांनुसार दंड आकारला जाईल. तसेच, जर तुम्ही दंड भरला नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. यामुळे परतफेडीसाठी अर्ज करणे (टीडीआर फाइलिंग) आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी नवीन तिकीट घेणे हाच योग्य मार्ग असतो.

TDR कसा दाखल करायचा:

जर तुमची ट्रेन चुकली असेल तर तुमच्या आरक्षण तिकिटाचा परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला टीडीआर दाखल करावा लागेल. जर तिकीट काउंटरवरून खरेदी केले असेल, तर तुम्हाला ऑफलाइन टीडीआर दाखल करावा लागेल. तुम्हाला रेल्वे स्टेशनवरील काउंटरला भेट द्यावी लागेल आणि टीडीआर फॉर्म भरावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल.

ऑनलाइन टीडीआर कसा दाखल करायचा

जर तिकीट ई-तिकीट असेल तर तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवर लॉग इन करावे लागेल.

ट्रेन पर्यायावर क्लिक करा आणि फाइल टीडीआर पर्याय निवडा.

नंतर तुमचे तिकीट निवडा, कारण निवडा आणि टीडीआर दाखल करा.

परतफेड रक्कम तुमच्या बँक खात्यात किंवा वॉलेटमध्ये जास्तीत जास्त ६० दिवसांच्या आत जमा होईल.

तिकीट रद्द करणे आणि परतफेड करण्याचे नियम काय आहेत?

रेल्वेच्या नियमांनुसार तत्काळ तिकिटे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळत नाही. जर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ४८ ते १२ तास आधी तुमचे तिकीट रद्द केले तर २५ टक्के रक्कम वजा केली जाईल. जर तुम्ही तुमचे तिकीट १२ ते ४ तास आधी रद्द केले तर ५०टक्के रक्कम वजा केली जाईल. ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वी प्रतीक्षा यादी आणि आरएसी तिकिटे रद्द करता येतात, त्यानंतर कोणतेही परतफेड केली जात नाही.

या स्थितीत जर तुमची ट्रेन चुकली तर घाबरू नका. जर तुमच्याकडे जनरल तिकीट असेल तर तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता, परंतु आरक्षित तिकिटाच्या बाबतीत, रिफंड (TDR) साठी अर्ज करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Chapati Recipe: नेहमीच्या चपातीला विसरा; घरी बनवा पौष्टिक अन् झटपट होणारी मसाला चपाती

Koshimbir Recipe: पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीची दह्यातली कोशिंबीर कशी बनवायची? सोपी रेसिपी

Ear health awareness: सततचा गोंगाट ठरतोय धोकादायक! शहरातील आवाजामुळे कमी होतेय ऐकण्याची क्षमता

Maharashtra Live News Update : पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानावर महाप्रसाद बंद करण्याची वेळ

बाईक रात्रभर सुरू ठेवली, घरात विष तयार झाले, ४ जणांचा गुदमरून मृत्यू, धक्कादायक घटनेनं राज्य हादरलं

SCROLL FOR NEXT