Railway Saam TV
बिझनेस

Confirm Train Ticket: वाह क्या बात है! कन्फर्म रेल्वे तिकिटासोबत प्रवाशांना मिळतात इतर ६ फायदे; आहेत का माहिती?

Bharat Jadhav

रेल्वेने प्रवास करायचा विचार करत असाल तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. रेल्वेचा प्रवास करताना कन्फर्म तिकिट घ्या, हे तिकीट घेतल्याने फक्त तिकीटचं नाही तर इतर फायदेसुद्धा मिळतात. कोणकोणते फायदे मिळतात हे बहुतांश प्रवाशांना माहिती नसतात. याची माहिती आपण घेणार आहोत. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

रेल्वेने सामान्य तिकट आणि कन्फर्म तिकिटाच्या माध्यमातून प्रवास करता येतो. परंतु वेळेअभावी आपण सामन्य तिकीट घेऊन रेल्वे प्रवास करत असतो. परंतु रेल्वेचं कन्फर्म तिकिट घेतल्याने आपला प्रवास आरामात होतोच शिवाय इतरही अनेक फायदे मिळत असतात.

काय आहेत कन्फर्म रेल्वे तिकिटचे फायदे

निवासाचा लाभ

तुम्हाला हॉटेलची गरज असेल आणि जर तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल तर तुम्ही IRCTC च्या dormitories चा म्हणजेच निवासाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही हे फक्त 150 रुपयांमध्ये 24 तासांसाठी मिळवू शकता.

फ्री बेडिंग

भारतीय रेल्वेच्या 1st, 2nd, and 3rd AC class एसी कोचमध्ये तसेच गरीब रथ ट्रेनमध्ये उशा, चादरी आणि ब्लँकेट मोफत मिळतात. जर तुमच्याकडे एसी सीट नसेल पण तिकीट कन्फर्म असेल तर ते तिकीट दाखवून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

वैद्यकीय सहाय्य

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला वैद्यकीय उपचाराची गरज असेल तर तुम्ही आरपीएफ जवानांना कळवून किंवा १३९ वर कॉल करून ट्रेनमध्ये तात्काळ मदत मिळवू शकता.

फ्री फूड

राजधानी, दुरांतो किंवा शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनचे कन्फर्म तिकीट असेल तर किंवा ट्रेनला आपल्या गंतव्य ठिकाणी पोहचण्यास २ तासांपेक्षा जास्त उशीर होणार असेल तुम्हाला IRCTC कॅन्टीनमधून मोफत जेवण मिळते. जेवण उपलब्ध नसल्यास १३९ वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

चेन्जिंग आणि क्लॉक रुम्स

सर्व रेल्वे स्थानकांवर चेंजिंग रूम आणि क्लोक रूम असतात. तेथे तुम्ही तुमच्या वस्तू ५० ते १०० रुपये प्रतिदिन शुल्कासह एका महिन्यापर्यंत ठेवू शकता. या सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे कन्फर्म केलेले रेल्वे तिकीट दाखवावे लागते.

वेटिंग रुमचे अॅक्सेस

ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी किंवा उतरण्यापूर्वी तुम्ही तुमचे तिकीट दाखवून नॉन-एसी किंवा एसी वेटिंग रुममध्ये आरामात थांबू शकता. या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

तिकीट कन्फर्म नसेल तरी करा प्रवास

तिकिट कन्फर्मेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी रेल्वेची एक खास योजना आहे, ज्याचा प्रवासी कधीही लाभ घेऊ शकतात. रेल्वे तिकीट बुक करताना काही कारणास्तव प्रवाशाचे तिकीट प्रतीक्षा यादीत असल्यास अशा प्रवाशाला रेल्वे एक पर्याय दिला जातो. या पर्यायाच्या मदतीने प्रवासी तिकीट कन्फर्म नसतानाही ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. याला वेगळे शुल्क घेतले जात नाही. रेल्वेने या सुविधेला 'विकल्प' असे नाव दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT