ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार नवीन हॉटेल सुरु करताना हॉटेलचे मु्ख्य प्रवेशद्वार हे पूर्व किंवा उत्तर दिशेस असावे.
हॉटेलमधील स्वयंपाकघराची दिशा कायम दक्षिण-पूर्व असावी.
कॅश काउंटर नेहमी हे पूर्व किंवा उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे.
हॉटेलमधील बाथरुमची दिशा कधीही स्वयंपाकघराच्या जवळ नसावी. ते नेहमी दक्षिण- पश्चिम दिशेस असावे.
हॉटेलमधील भिंतींचा रंग गडद असावे,जसे की हिरवा, निळा ,पिवळा असे असावे.
हॉटेलमध्ये तुम्ही विविध फुल असलेली रंगीबेरंगी झाडे लावू शकता,अशाने सकारात्मक वातावरण निर्माण होते.
हॉटेलमधील बसण्याची जागा तळमजल्यावर असावी.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.