रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. अनेकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. सगळ्यात सोपी आणि सहजपणे प्रवास करता येणारी वाहतूक व्यवस्था म्हणजे रेल्वे. काहींचा हा प्रवास रोजचा तर काहींना अगदी कंटाळवाणा वाटतो.
अशातच रेल्वे (Railway) मंडळाने प्रवाशांना दिलासादायक बातमी दिली आहे. मंगळवारी यूटीएस अॅपद्वारे पेपरलेस तिकीट काढण्यासाठी बाह्य मर्यादेचे बंधन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून पेपरलेस तिकीट काढता येणार आहे.
यूटीएस अॅपवरुन लाखो प्रवाशी रेल्वचे तिकीट बुक (Book) करतात. पेपरलेस तिकीटाचा सकारात्मक परिणाम बघून हा निर्णय घेण्यात आला आहे.
1. तिकीट काढताना अंतर किती असायला हवे?
प्रवाशांना रेल्वेचे तिकीट यूटीएस अॅपवरुन बुक करायचे असेल तर तिकीट काढताना रेल्वे परिसरापासून २० किमी आणि रेल्वे गाडीचे तिकीट काढताना ५०किमी अंतर राखण्याची मर्यादा होती. यामध्ये आता बदल करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट प्रक्रिया सुरळीत करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
2. अंतर्गत नियमांत बदल नाही
यूटीएस अॅपद्वारे प्रवाशांना लोकल, रेल्वे गाडीचे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट काढता येते. यामध्ये रेल्वेने कोणताही बदल केलेला नाही. तर यात रेल्वे स्थानक परिसराबाहेर तिकिट काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेत किंवा प्लॅटफॉर्मवर असताना तिकीट काढता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.