Indian Railways Rules : ट्रेनने प्रवास करताना या चुका कधीच करू नका; जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम

Indian Railway Rules in Marathi : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काही नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. प्रवासापूर्वी भारतीय रेल्वेचे नियम जाणून घ्या. वाचा सविस्तर
Central Railway Service
Central Railway ServiceSaam tv

मुंबई : देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम तयार केले आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काही नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. प्रवासापूर्वी भारतीय रेल्वेचे नियम जाणून घ्या.

भारतात विमानानंतर रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी मानला जातो. रेल्वेने प्रवास करण्याआधी तिकीट काढणे गरजेचे असते. रेल्वेच्या नियमांचं पालन न केल्यास दंड देखील भरावा लागू शकतो.

Central Railway Service
Railway Police : रेल्वे पोलिसांच्या मदतीला तिसऱ्या डोळ्यासह कानही; काय आहे गुन्हेगारी रोखण्यासाठीचा आईज अँड इअर्स उपक्रम

भारतीय रेल्वेने काही वस्तूंची यादी तयार केली आहे. रेल्वे प्रवासी या वस्तू घेऊन प्रवास करू शकत नाही. तरीही काही प्रवासी रेल्वे पोलिसांची नजर चुकवून या वस्तू घेऊन जातात. मात्र, पोलिसांना या वस्तू आढळल्यास सदर प्रवासी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येऊ शकते.

रेल्वे प्रवासातील प्रतिबंधित वस्तू कोणत्या?

>>स्टोव्ह

>> गॅस सिलिंडर

>> कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील केमिकल

>> फटाके

>> अॅसिड

>> दुर्गंधी वस्तू

>> पॅकेजमधील तेल

>> ग्रीस

>> प्रवासादरम्यान इतर प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या वस्तू

Central Railway Service
Railway Fact: रेल्वेचा अप आणि डाऊन मार्ग म्हणजे नेमकं काय?

तुम्ही ट्रेनने प्रवास करताना काही ठराविक वजनाच्या पुढे वस्तू घेऊन प्रवास करू शकत नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी वस्तूच्या वजनाबाबत नियम तयार केला आहे. भारतीय रेल्वेचया नियमानुसार, एका प्रवासी प्रवास करताना ४० किलो ते ७० किलोग्राम वजनाच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो. मात्र, वस्तू या वजनापेक्षा अधिक असेल तर प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतात.

railway rules
railway rules Google

ट्रेनने प्रवास करत असताना इतर प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकू शकत नाही. तुमच्या कृत्यामुळे इतर प्रवाशांना त्रास झाला तर, तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com