Railway RCF Kapurthala Apprentice Recruitment 2026 Saam Tv
बिझनेस

Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Railway Job Recruitment 2026 Update News : रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथळा येथे अप्रेंटिसच्या ७३४ पदांसाठी भरती सुरू. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्जाची अंतिम तारीख आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • RCF कपूरथळामध्ये अप्रेंटिसच्या ७३४ पदांसाठी भरती

  • लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार नाही

  • पात्रतेसाठी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२६

तरुणांनो सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. रेल्वे कोच फॅक्टरी (RCF), कपूरथला येथे अप्रेंटिसशिपच्या तब्बल ७३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट rcf.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज भरता येणार आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणेही गरजेचे आहे. उमेदवाराचे वय ५ सप्टेंबर २०२६ रोजी किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार पात्र उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. दहावी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२६ आहे, तर अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२६निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी RCF ची अधिकृत वेबसाइट उघडा. त्यानंतर “Apply for online application of Act Apprentice Training” या लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करा. पुढे आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे आणि शुल्काची प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट सांभाळून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Maharashtra News Live Update: शिवसेना कोणाची? सुनावणी संपली, १६ तारखेला शिंदे गट पुन्हा करणार युक्तीवाद

Suntwada Recipe: कृष्ण जन्माष्टमीला घरच्या घरी बनवा पारंपरिक सुंठवडा; साहित्य अगदी मोजकंच

Eyebrow : आयब्रोचे केस पातळ झालेत? या ७ आजारांची असू शकतात गंभीर लक्षणं

Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT