Share Market Latest News in Marathi  Saam TV
बिझनेस

Share Market News : तब्बल ५५०० टक्क्यांची वाढ, १ लाखाचे झाले ५७ लाख; या छोट्या कंपनीनं गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं!

Share market investment : राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीच्या ८ शेअर्सने ८ वर्षांत ५५०० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये या काळात १ लाख गुंतवणूक केली असेल त्यांची रक्कम आता ५७ लाख रुपये झाली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेड या छोट्या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्सच्या शेअर्सने मागील ८ वर्षांत ५५०० टक्क्यांनी उसळी घेतली. कंपनीच्या शेअर्समध्ये ८ वर्षांपूर्वी १ लाख गुंतवणूक करणाऱ्यांचे आता ५७ लाख झाले आहेत. रेखा झुनझुनवाला आणि आशीष कचौलिया यांच्यासहित अनेक दिग्गजांनी या कंपनीवर डाव लावलाय. या कंपनीने मागील ८ वर्षांत त्यांच्या शेअरधारकांना २ वेळा बोनस शेअर देखील दिले आहेत.

लाखाचे झाले ५७ लाख

राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्सचा शेअर २६ ऑगस्ट २०१६ साली २१.२५ रुपयांवर होता. तर कंपनीचा शेअर आज २ सप्टेंबर २०२४ रोजी १२२९.९५ रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये ८ वर्षांत ५५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये २६ ऑगस्ट २०१६ साली ज्यांनी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आता त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य ५७.८८ लाख झालं असेल. तसेच यामध्ये कंपनीने दिलेले बोनस शेअर्स आणि लाभांशचा (Dividend) देखील समावेश करण्यात आलेला नाही. कंपनीच्या शेअर्सचा समावेश ५२ आठवड्यांच्या उच्च पातळवीर झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सचं मूल्य आता १,२३६ रुपये झालं आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांची निचांक पातळी ही ४८५ रुपयांपर्यंत आहे.

दिग्गजांनी दाखवला कंपनीवर विश्वास

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचे ११,४३,८५२ शेअर्स असून कंपनीमध्ये ४.९८ टक्के भागीदारी आहे. तर आशीष कचौलिया यांच्याजवळ कंपनीचे ४,६३,३६६ शेअर्स असून कंपनीमध्ये त्यांची २.०२ टक्के भागीदारी आहे. मुकुल महावीर अग्रवाल यांच्याजवळ कंपनीचे ३,५६,१४८ शेअर्स आहेत.

कंपनीने दिले दोनदा बोनस शेअर्स

या कंपनीने मागील ८ वर्षांत गुंतवणूकदारांना २ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने मे,२०१८ साली २.५ च्या प्रमाणाने बोनस शेअर्स दिले होते. कंपनीने ५ शेअर्सवर २ बोनस शेअर्स दिले होते. कंपनीने ऑगस्ट २०२३ मध्ये १:१ च्या प्रमाणाने बोनस शेअर्स दिले होते. कंपनीने एका शेअर्सवर १ शेअर दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Maharashtra Live News Update : मला मंत्रीपद मिळतं म्हणून विरोधकांच मन जळतं - रामदास आठवले

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी

SCROLL FOR NEXT