What is Business Strategy Of Dmart:  Saamtv
बिझनेस

Dmart Profit Strategy: 'डी-मार्ट'मध्ये सगळं स्वस्त कसं मिळतं बरं? फक्त १२ वी पास व्यक्तीची भन्नाट बिझनेस आयडिया; एकदा वाचाच....

What is Business Strategy Of Dmart: डी-मार्टमध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या स्वस्त कशा काय मिळतात बरं? काय आहे नेमका भन्नाट बिझनेसचा फंडा? वाचा सविस्तर...

Gangappa Pujari

स्वस्तात मस्त, खिशाला परवडेल अशा दरात भारी अन् ब्रँडेड वस्तू मिळण्याचं ठिकाणं म्हणजे डी-मार्ट. डीमार्टमध्ये शॉपिंग करायला न गेलेला व्यक्ती सापडणे आता कठीणच. सर्वात जास्त ऑफर आणि डिस्कांऊट देणारे स्टोअर म्हणजे डी-मार्ट. पण ह्या डीमार्टमध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या स्वस्त कशा काय मिळतात बरं? काय आहे नेमका भन्नाट बिझनेसचा फंडा? फक्त १२ वी पास व्यक्तीने कसं उभं केलं कोट्यावधींचं साम्राज्य? वाचा सगळं सविस्तर....

डीमार्टचे मालक राधाकिशन दमाणी

राधाकिशन दमाणी यांचा हा विश्वास आणि बिझनेस आयडिया हे डीमार्टच्या यशाची किल्ली आहे. राधाकिशन दमानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची संपत्ती एक लाख कोटींहून अधिक आहे. राधाकिशन दमानी केवल 12वी उत्तीर्ण झाले आहेत पण त्यांच्या कौशल्यामुळे आणि कुशाग्र बुद्धीमुळे आज त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे आहे.

ही तीच व्यक्ती आहे ज्यांना दिवंगत ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आपले गुरू मानत होते. राधाकिशन दमानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची संपत्ती एक लाख कोटींहून अधिक आहे. राधाकिशन दमानी केवल 12वी उत्तीर्ण झाले आहेत पण त्यांच्या कौशल्यामुळे आणि कुशाग्र मनामुळे आज त्यांची संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे.

असा सुरू केला व्यवसाय..

शेअर बाजारात झेंडा रोवणाऱ्या दमानी यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागले. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा नेरूळची फ्रँचायझी घेतली जी अयशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी बोअरवेल बांधण्यास सुरुवात केली पण हे कामही पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी मुंबईत डीमार्टचे पहिले स्टोअर उघडले. त्यानंतर त्यांनी ठरवले की ते कोणत्याही भाड्याच्या जागेत डीमार्ट स्टोअर सुरू करणार नाहीत. आज डीमार्ट ची देशात 300 हून अधिक स्टोअर्स आहेत. म्हणजे राधाकिशन दमाणी यांच्याकडे केवळ डीमार्ट स्टोअर्स नाहीत तर त्यांच्याकडे भारतात 300 मोठ्या आकाराच्या जमिनी आहेत. ही दुकाने 11 राज्यांमध्ये पसरलेली आहेत.

वस्तू स्वस्त मिळण्याचे गणित काय?

डी मार्टचे स्टोअर जागा खरेदी करुन उभे केले जाते ज्याचा त्यांना मोठा फायदा होतो. त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत आणि त्यांना नियमित अंतराने भाडे द्यावे लागत नाही. हा उरलेला खर्च ते माल स्वस्त ठेवण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे डीमार्ट 5-7 टक्के बचत करते आणि सवलतीच्या रूपात लोकांना देते. दुसरे कारण म्हणजे डीमारट त्याचा स्टॉक लवकर संपवते. ३० दिवसांत माल संपवून नवीन माल मागवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, डीमार्टकडून कंपन्यांना फार लवकर पेमेंट जाते. यामुळे उत्पादक कंपन्याही डीमार्टला सवलतीत वस्तू पुरवतात. या सवलतीचा वापर लोकांना सवलत देण्यासाठी किंवा स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी देखील केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे नापणे धबधब्यावर लोकार्पण

Nanded News: स्मशानभूमीच्या वादावरून दोन गावचे गावकरी भिडले, अंत्ययात्राच थांबवली|VIDEO

Coriander Benefits: हाय बीपी आणि डायबिटीजसाठी वरदान ठरेल तुमच्या किचनमधील 'ही' एक गोष्ट

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

SCROLL FOR NEXT