Kolhapur MNS News : खाद्यपदार्थाच्या पाकिटात आढळल्या अळ्या, कोल्हापुरात मनसेनं केलं 'डी मार्ट' बंद; पाहा व्हिडिओ

Kolhapur News: डी मार्टमध्ये बंद पाकीट असलेल्या खाद्यपदार्थात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला. यानंतर मनसेने आंदोलन करत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना डी मार्ट बंद पाडण्यास भाग पाडले.
खाद्यपदार्थाच्या पाकिटात आढळल्या अळ्या, कोल्हापुरात मनसेनं केलं 'डी मार्ट' बंद; पाहा व्हिडिओ
Kolhapur MNS NewsSaam Tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

कोल्हापुरात डी मार्टमध्ये बंद पाकीट असलेल्या खाद्यपदार्थात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला. यानंतर मनसेने आंदोलन करत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना डी मार्ट बंद पाडण्यास भाग पाडले. मनसेने डी मार्ट प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे डी मार्टमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथे असलेल्या डी मार्टमध्ये ग्राहक निलेश पुरोहित यांनी केलॉक्स मुसळी हे बंद पाकिटातील खाद्यपदार्थ खरेदी केले होते. यानंतर त्यांनी हे पॅकेट घरी घेऊन गेल्यानंतर दुधात मिक्स केलं. यावेळी त्यांना दुधामध्ये अळ्या तरंगताना आढळून आल्या. यानंतर त्यांनी संपूर्ण पाकीट रिकामा केल्यानंतर त्या खाद्यपदार्थात अनेक अळ्या असल्याचं निदर्शनास आलं.

खाद्यपदार्थाच्या पाकिटात आढळल्या अळ्या, कोल्हापुरात मनसेनं केलं 'डी मार्ट' बंद; पाहा व्हिडिओ
Nanded News: पोलीस पाटलाची आत्महत्या, टोकाचं पाऊल उचलण्याआधीचा VIDEO आला समोर

पुरोहित यांनी तात्काळ डी मार्ट प्रशासनाला ही बाब दाखवून दिली. त्यांनी सुरुवातीला उडवाडवीची उत्तरे दिली असल्याचं संबंधित ग्राहकानी सांगितलं. यानंतर त्या ग्राहकाने याबाबतची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांना दिली. प्रसाद पाटील आणि राजू दिंडोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डी मार्ट वर धडक मोर्चा काढून डी मार्ट प्रशासनाला धारेवर धरलं.

काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार डी मार्टमध्ये घडला होता. त्यामुळे त्यांनी अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं वारंवार नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डी मार्टवर कारवाई का केली जात नाही? असा जाब विचारला. डी मार्टवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी आणि जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही, तोपर्यंत डी मार्ट बंद करावे, अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.

खाद्यपदार्थाच्या पाकिटात आढळल्या अळ्या, कोल्हापुरात मनसेनं केलं 'डी मार्ट' बंद; पाहा व्हिडिओ
Krishna River News: कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली, पुराचा धोका; सांगली महापालिका अलर्ट मोडवर

याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय शेंडकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह डी मार्टमध्ये दाखल झाले त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली. अखेर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डी मार्ट बंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अचानक डी मार्ट बंद केल्यामुळे डी मार्टमध्ये असणाऱ्या ग्राहकांना साहित्य न घेताच बाहेर पाडाव लागलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com