PM FASAL BIMA YOJANA DEADLINE EXTENDED TO AUGUST 10, 2026 | MAHARASHTRA CROP INSURANCE NEWS Saam Tv
बिझनेस

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या A to Z माहिती

Pik Vima Yojana Update News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Alisha Khedekar

  • कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढव

  • तांत्रिक अडचणी आणि आवश्यक कागदपत्रांतील विलंबामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय

  • राज्यात आतापर्यंत ६१.८२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत ३१ जुलैवरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे. राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज करू शकले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ही माहिती देत एल निनोच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. विभागनिहाय पाहता छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक १३.२५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, कोकण विभागातून केवळ १ लाख २ हजार ३३५ अर्ज प्राप्त झाले आहेत.

याशिवाय नाशिक विभागातून ३.३३ लाख, पुणे विभागातून ६.०७ लाख, कोल्हापूर विभागातून २.४० लाख, लातूर विभागातून २.४२ लाख, अमरावती विभागातून ६.९१ लाख आणि नागपूर विभागातून ४.५३ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणी किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे मुदतवाढीचा लाभ घेत शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या नेत्याची आमदारकी धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने दिला अल्टिमेटम, राज्याच्या राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गर्दी

पार्लरला जाण्याची गरज नाही! रोज 10 मिनिटे चेहरा आणि मानेला मसाज करा, त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

पेट्रोल ₹१२५ रुपये लिटर झाले असते! सरकारच्या दाव्याने वाहनचालक चक्रावले; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 63% पर्यंत वाढण्याची शक्यता, पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT