Education Loan Saam Tv
बिझनेस

Education Loan: उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय मिळणार ७.५ लाखांचे कर्ज; सरकारची नवी योजना काय आहे?

PM Vidyalakshmi Yojana: सरकारने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.

अनेकदा मुलांना पैशाअभावी स्वतः चे शिक्षण सोडावे लागते. उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळेच ही योजना राबवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेत शिक्षण घेण्यासाठी गरीब मुलांना कर्ज दिले जाते. कर्जासोबतच अनुदानदेखील दिले जाते. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (PM Vidyalakshmi Yojama)

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थेत (QHEI)प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि अभ्यासासाठी लागणाऱ्या खर्चासाठी पैसे दिले जातात. त्यांना कोणत्याही हमीशिवाय मदत केली जाते. या योजनेत कोणत्याही हमीशिवाय वित्तीय संस्था किंवा बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेत दरवर्षी २२ लाखांहून अधिक विद्यार्थी कर्ज घेतात. त्यांना ७.५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याचसोबत कर्जासाठी ७५ टक्के क्रेडिट गॅरंटीदेखील दिले जाते.

या योजनेत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्यांना आर्थिक मदत मिळते. जे कोणत्याही शिष्यवृत्ती किंवा व्याज अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेत १० लाखांपर्यंतचा कर्जावर ५ टक्के व्याज सवलत दिली जाते. (Loan For Higher Education)

या योजनेत दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनेत तांत्रिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार प्राधान्य देते. या योजनेत विद्यार्थ्यांना व्याज सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. (Education Loan)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bopdev Ghat Case: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड

Tuljabhavani Mandir : दिवाळी सुटीत तुळजाभवानी मंदीर संस्थानला मिळाले ७६ लाख उत्पन्न; भाविकांची अजूनही गर्दी

Eating Star Fruit: स्टार फ्रूट खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

Honeymoon Destination: हनिमूनसाठी परदेशात जायचंय? अवघ्या 40 हजार रुपयांमध्ये 'या' ठिकाणांना ह्या भेट , जाणून घ्या...

Gold Price Today: अमेरिकेच्या निवडणूकीनंतर आज सोन्याचा दर घसरला; पाहा आज सोन्याची किंमत काय?

SCROLL FOR NEXT