Money Double Scheme Saam tv
बिझनेस

Money Double Scheme : PPF, म्युच्युअल फंड आणि बँक एफडीतून पैसे होतील डबल, कसे? जाणून घ्या सविस्तर

Which Is Best Investment PPF, Mutual Fund Or Bank FD : पीपीए, म्युच्युल फंड आणि बँक एफडीतून पैसे डबल करायचे असतील तर ७२ चा नियम लक्षात ठेवायला हवा.

कोमल दामुद्रे

Best Investment Plan :

वाढती महागाई पाहाता प्रत्येकालाच वेळेनुसार श्रीमंत होण्याची इच्छा आहे. मात्र घरखर्च आणि इतर गोष्टींमुळे आपल्याला पैसे साठवता येत नाही. परंतु, जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

पैसे साठवताना किंवा गुंतवताना काही नियम लक्षात ठेवयाला हवे. पीपीए, म्युच्युल फंड आणि बँक एफडीतून पैसे डबल करायचे असतील तर ७२ चा नियम लक्षात ठेवायला हवा. ज्यामुळे तुमचे पैसे लवकरच दुप्पट होतील. जाणून घेऊया कसे

1. बँक FD :

बँक (Bank) एफडी करताना सर्व बँका या ७ ते १० वर्षांसाठी ऑफर देतात. त्यामध्ये फक्त वर्षाला व्याजदर बदलते. जर तुम्ही १ लाख गुंतवत असाल तर सात टक्के व्याजाने रक्कम दुप्पट होईल. तसेच १० वर्षापेक्षा जास्त कालावधी दुप्पट होण्यासाठी लागेल.

2. पीपीएफमधून पैसे होतील दुप्पट

सध्या पीपीएफमध्ये (PPF) ७.१ टक्के व्याज दिले जाते. अशावेळी ७२ च्या नियमानुसार तुमचे पैसे १० वर्षांपेक्षा कमी वेळेत दुप्पट होतील.

3. इक्विटीमध्ये रक्कम दुप्पट

मागच्या काही काळापासून निफ्टीने १३. ५ टक्के आणि मागील पाच वर्षात ८० टक्के परतावा दिला आहे. अशातच जर इथे गुंतवणूक केल्यास आपली रक्कम पाच वर्षात दुप्पट होऊ शकते.

4. म्युच्युअल फंड

जर तुम्हाला म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर त्यात सरासरी परतावा १२ टक्के मिळेल. यामध्ये तुमचे पैसे ६ वर्षात दुप्पट होऊ शकतात. जर तुम्ही या पद्घतीने गुंतवणूक करत असाल तर तुम्ही योग्यप्रकारे ७२ चा नियम समजून करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT