Post Office Top 5 Schemes saam tv
बिझनेस

Post Office Top 5 Schemes: पोस्ट ऑफिसच्या 5 भन्नाट योजना! मिळवा 8.2% पर्यंत व्याज, गुंतवणुकीवर सुरक्षित परतावा

Post Office Interest Rates 2026: पोस्ट ऑफिसच्या जेष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याज मिळतं.

Sakshi Sunil Jadhav

महागाईच्या काळात पैशांची बचत करणं खूप महत्त्वाचं झालंय. पण गुंतवणूक करताना पैसे सुरक्षित राहावेत आणि त्यावर चांगलं व्याजही मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते.अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये जेष्ठ नागरिकांपासून ते मुलींच्या भविष्यासाठी आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यातल्या काही योजनांवर ८.२ टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळतं. जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या अशाच ५ लोकप्रिय योजनांची माहिती.

१. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

रिटायरमेंटनंतर सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न हवं असेल तर ही योजना फायदेशीर ठरेल. या योजनेत सध्या ८.२ टक्के वार्षिक व्याज दिलं जातं. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना खातं उघडता येतं. यामध्ये जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. व्याजाचे पैसे दर तीन महिन्यांनी मिळतात.

२. सुकन्या समृद्धी योजना (SSY)

मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी बचत करण्याची इच्छा असणाऱ्या पालकांसाठी ही योजना फायद्याची आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीला नावाने खातं उघडता येतं. सध्या या योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याज मिळतं. एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करता येतात.

३. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

करबचतीसोबत सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्याची इच्छा असेल तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा विचार करू शकता. या योजनेवर ७.७ टक्के वार्षिक व्याज मिळतं. जुन्या करप्रणालीअंतर्गत पात्र गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार करसवलत मिळू शकते.

४. किसान विकास पत्र (KVP)

गुंतवलेली रक्कम ठराविक कालावधीत दुप्पट करण्याचा पर्याय शोधत असाल, तर किसान विकास पत्राचा विचार करू शकता. या योजनेवर ७.५ टक्के वार्षिक व्याज मिळतं. सध्याच्या दरानुसार गुंतवणुकीची रक्कम ११५ महिन्यांत दुप्पट होते.

५. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)

दर महिन्याला रोज उत्पन्न मिळवायचं असेल ही योजना फायदेशीर ठरू शकते. यावर ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळतं. या योजनेत एकल खात्यासाठी ९ लाख रुपये, तर संयुक्त खात्यासाठी १५ लाख रुपये गुंतवता येतात. व्याजाची रक्कम दर महिन्याला दिली जाते.

महत्त्वाचे: पोस्ट ऑफिसच्या या योजनांचे व्याजदर सरकारकडून दर तीन महिन्यांनी बदलले जाऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याचे व्याजदर, पात्रता, करनियम आणि मुदत यांची अधिकृत पोस्ट ऑफिसमध्ये खात्री करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरही फायनान्स एजंटचा वसुलीसाठी तगादा

Silver Jewellery Cleaning: काळे पडलेले चांदीचे दागिने नव्यासारखे चमकतील! फक्त हे ३ घरगुती उपाय करा

Vijay Wadettiwar : ...तर मी शरद पवारांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन; असं का म्हणाले वडेट्टीवार? पाहा Video

एका तासाच्या बैठकीनंतर स्टॅलिन हॉटेलबाहेर पडले; काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश?

Matheran news : माथेरानच्या मिनी ट्रेनच्या रुळांवर कार कोसळली! थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT