सध्या देशभरातील राजकारणात डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा सुरु आहे. या विधेयकाला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असून या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवार यांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. सत्तेसाठी जगायचे आणि सत्ता घेऊन मरायचे, एवढाच विचार त्यांच्या डोक्यात असतो, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, आता त्यांनी आपल्या विधानाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे.
शरद पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध केला, तर मी त्यांची जाहीरपणे माफी मागेन. एवढेच नाही, तर त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. माझा शरद पवार यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. देशातील लोकशाही टिकली पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहिला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे पवार साहेबांनी देशाच्या लोकशाहीचा विचार करून या विधेयकाला पाठिंबा देऊ नये, अशी हात जोडून विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.