Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही फक्त व्याजातून २ लाख रुपये कमवू शकणार आहात. या योजनेत तुम्हाला भरघोस परतावा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.आपल्याला भविष्यात पैशांची चणचण भासू नये म्हणून पैसे आतापासूनच सेव्हिंग करायला हवेत. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातूनच लाखो रुपये कमवू शकतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना सर्व वयोगटासाठी आहे. या योजनेत जबरदस्त परतावा मिळतो. या योजनेत जर तुम्ही ५ वर्षांसाठी पैसे लावले तर तुम्हाला व्याजातूनच लाखो रुपये नफा होणार आहे. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे खूप फायदा होतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही टेन्योग इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेत १ वर्ष, २वर्ष, २ वर्ष आणि ५ वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करु शकतात. एका वर्षासाठी गुंतवणूक केली चर ६.९ टक्के व्याज मिळते. २ किंवा ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७ टक्के व्याजदर मिळते. ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७.५ टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेतजर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्हाला २,२४,९७४ रुपये रिटर्न मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीवर ७,२४,९७४ रुपये मिळणार आहे. म्हणजेच फक्त व्याजातून तुम्हाला २ लाखांपेक्षा जास्त रुपये मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. या योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत फक्त १००० रुपये गुंतवून अकाउंट उघडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Dhule Accident : भीषण अपघात; ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने ट्रक अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

SCROLL FOR NEXT