UPS: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन स्कीम? कोणाला किती फायदा होणार?

Unified Pension Scheme: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून युनिफाइड पेन्शन स्कीम लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे.
UPS
UPSSaam Tv
Published On

केंद्र सरकार १ एप्रिलपासून युनिफाइड पेन्शन स्कीम (Unified Pension Scheme) लागू करणार आहे. या नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीमअंतर्गत युनिफाइड पेन्शन स्कीमची घोषणा केली होती. ही स्कीम १ एप्रिलपासून लागू होणार आहे. याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. जे कर्मचारी आधीच नॅशनल पेन्शन स्कीमअंतर्गत रजिस्टर केले आहे त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

UPS
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

UPS स्कीम आहे तरी काय? (What Is UPS Scheme)

युनिफाइड पेन्शन स्कीमअंतर्गत आता केंद्रिय कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे. रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षातील बेसिक सॅलरीच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी २५ वर्षे सर्व्हिस केलेली असणे गरजेचे आहे. जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना ६० टक्के पेन्शन मिळते. तसेच मिनिमन एश्योर्ड पेन्शन दिली जाते. जर कोणी १० वर्षांपर्यंत नोकरी केली असेल तर त्यांना १० रुपये पेन्शन मिळणार आहे.

सरकार किती योगदान देणार?

एनपीएसअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून १० टक्के योगदान मिळायचे. दरम्यान आता यूनिफाइड पेन्शन स्कीमअंतर्गत १४ टक्के योगदान सरकारकडून दिले जाते. या योजनेचा फायदा २३ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

यूनिफाइड पेन्शन स्कीमअंतर्गत महागाई भत्तादेखील पेन्शनमध्ये जोडला जाणार आहे. तसेच रिटायरमेंटवर एकरकमी पैसे दिले जाणार आहे. या योजनेचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना होणार आहे.

UPS
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

२५ जानेवारी २०२५ रोजी सरकारने या स्कीमबाबत माहिती दिली होती. जे कर्मचारी एनपीएसअंतर्गत येतात तेदेखील हा ऑप्शन निवडू शकतात. यूपीएस स्कीम निवडणारे कर्मचारी इतर पॉलिसी, पॉलिसी चेंज किंवा फायनान्शियल बेनिफिटचा लाभ घेऊ शकणार नाही.

UPS
Government Schemes: उन्हाळ्यात एसी चालवायचाय अन् पैसेही वाचवायचेत? या सरकारी पद्धतीने वाचवा वीजबिल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com