Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; वाचा सविस्तर

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेतून तुम्ही फक्त व्याजातूनच २ लाख रुपये कमवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना

फक्त व्याजातून मिळणार २ लाख रुपये

सुरक्षित अन् जबरदस्त परतावा देणारी योजना

सध्याच्या जगात प्रत्येकजण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे खूप गरजेचे आहे. कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा काळात तुमच्याकडे पैसे असायला हवे. अनेकदा आपण आपल्या पगारातील ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतो. परंतु ही रक्कम कुठे गुंतवायची याबाबत अनेकांना माहिती नसते. गुंतवलेल्या रक्कमेवर चांगला परतावादेखील मिळणे गरजेचे असते. दरम्यान, याचसाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. सरकारच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही फक्त व्याजातून लाखो रुपये कमवू शकतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेतील गुंतवणूक ही खूप फायद्याची ठरते. यामधील व्याजदर सतत बदलत असते. त्यामुळे तुम्हाला चांगला परतावादेखील मिळतो. सरकारच्या या योजनेत एक वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर ६.९ टक्के व्याज मिळते. दोन वर्षांसाठी ७ टक्के तर तीन वर्षांच्या गुंतवणूकीवर ७.१ टक्के व्याजदर मिळते. जर तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला सर्वाधिक ७.५ टक्के व्याज मिळणार आहे.

फक्त व्याजातून मिळवा २ लाख रुपये

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत फक्त व्याजातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. तुम्ही जर या योजनेत ५ वर्षांच्या कालावधीसाठी ५ लाख रुपये गुंतवले तर त्यावर ७.५ टक्क्यानुसार व्याज मिळणार आहे. तुम्हाला मॅच्युरिटीनंतर २,२४,९७४ रुपये फक्त व्याजातून मिळणार आहे. तुम्हाला व्याजातूनच लाखो रुपये मिळणार आहे.

पोस्टाच्या या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. तुम्हाला या योजनेत इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सुटदेखील मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक सर्वसामान्यांसाठी बेस्ट आहे. कमी गुंतवणूकीत तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT