Post Office TD Vs SBI FD yandex
बिझनेस

Post Office TD Vs SBI FD: गुंतवणूक करताय? जाणून घ्या, कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल सर्वाधिक व्याज

Bharat Jadhav

Post Office TD vs SBI Fixed Deposit:

गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान बहुतेक पर्यायांमध्ये जोखीम देखील असते. जर तुम्हाला जोखीम नसलेले गुंतवणूक पर्याय निवडण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यात पर्यायापैकी एक पर्याय म्हणजे स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील योजना . या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करणं हे जोखीम नसलेला पर्याय आहे. (Latest News)

पण स्टेट बँक आणि पोस्ट ऑफिसमधील योजनांची तुलना केल्यास कोणत्या ठिकाणी चांगली गुंतवणूक योजना आहे, हे जाणून घेऊ. आज आपण पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीम आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीबद्दल माहिती येणार आहोत. कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास सर्वात जास्त व्याज मिळेल, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीम Post Office Time Deposit

पोस्ट ऑफिसची टीडी म्हणजेच टाइम डिपॉजिट योजनेत १ वर्षाच्या कालवधीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला. तर तुम्हाला ६.९० टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही दोन वर्षासाठी एफडी कराल तर ७ टक्क्यांचे व्याजदर मिळेल. जर तुम्ही ३ वर्षासाठी एफडी केल्यास ७ टक्के व्याज तुमच्या गुंतवणुकीवर मिळेल.

SBI Fixed Deposit एसबीआय फिक्स डिपॉजिट

स्टेट बँक ऑफ इंडियाची फिक्स डिपॉजिट योजनेमध्येही चांगला मोबदला मिळत असतो. जर तुम्ही दोन किंवा ३ वर्षासाठी एफडी कराल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर ७ टक्के व्याज मिळेल. जर जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या नावावर एफडी केली असेल तर ७.५० टक्के व्याज तुमच्या गुंतवणुकीवर मिळेल.

त्याचबरोबर तुम्ही फिक्स डिपॉजिटनुसार, अमृत कलश स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.१० टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही ४०० दिवसांसाठी एफडी केली तरी हेच व्याजदर लागू होतील. तर वरिष्ठ नागरिकांना अमृत कलश योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास ७.६० टक्के व्याजचा फायदा मिळेल. पोस्ट ऑफिस आणि एसबीआय या दोन्ही ठिकाणी ग्राहकांना दोन वर्षासाठी एफडी करता येते. तर अमृत कलश योजनेअंतर्गत ग्राहकांनी एफडी केल्यास ७.१० टक्के व्याजदर तुमच्या गुंतवणुकीवर मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पंखा थांबवून लड्डू मुत्त्या बाबाचा भक्तांना आशीर्वाद? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली, भरणेंचं टेंशन वाढलं; आमदार झाले तर पाटलांचं मंत्रिपद पक्क? VIDEO

Prashant Paricharak: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?

Rohit Sharma: रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करणार? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT