Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५ लाख रुपये

Post Office TD Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातून ४.५ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना

फक्त एकदा गुंतवणूक करा अन् लाखो रुपये मिळवा

फक्त व्याजातून मिळतात ४.५ लाख रुपये

प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. चांगल्या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या सरकारी योजनांमधील गुंतवणूक ही सुरक्षित असते.पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या योजनेत पाच वर्षात फक्त व्याजातून ४.५ लाख रुपये कमवू शकतात.

पोस्ट ऑफिसची योजना (Post Office Time Deposite Scheme)

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. एकदाच पैसे गुंतवून तुम्हाल लाखो रुपयांचा परतावा मिळणार आहे. या योजनेत ५ वर्षानंतर ४.५ लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे.

या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. त्यावर तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळते.या योजनेत तुम्हाला चांगला रिटर्न मिळता.जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर लाखो रुपयांचे व्याज मिळणार आहे. या योजनेत ५ वर्षानंतर तुम्हाला १४.५ लाख रुपये मिळणार आहे. म्हणजेच फक्त व्याजातून ४.५ लाख रुपये मिळणार आहेत.

फक्त व्याजातून कमवा लाखो रुपये

या योजनेत तुम्ही जेवढी रक्कम गुंतवणार त्या आधारावर तुम्हाला व्याज मिळणार आहे. या योजनेत जर तुम्ही ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २,२४,९७४ रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ७,२४,९७४ रुपये मिळणार आहे. व्याजातून फक्त तुम्हाला सव्वा दोन लाख रुपये मिळणार आहेत.

या योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्सपासूनदेखील सूट मिळते. या योजनेत तुम्ही गुंतवणूकीच्या आधारावर लोनदेखील मिळवू शकतात. या योजनेत तुमचे पैसे फक्त वाढणार नाही तर तुम्हाला चांगला फायदादेखील होणार आहे.

या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांचेही खाते उघडू शकतात. मुलांचे पालक हे अकाउंट उघडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune District Bank : भात पिकावर करपा रोगाचे सावट; पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दिलासा, सरसकट दहा हजाराचे कर्ज

India Tourism : भारतातील 'या' गावी सर्वात आधी सूर्य उगवतो, पहाटे ४ पासून पर्यटकांची होते गर्दी

Maharashtra Live News Update: मेट्रो दोन तासांपासून खोळंबली, मुंबईकरांची कोंडी

Latur : लातूरच्या ढोकी गावात मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी, संसार उघड्यावर, भयानक परिस्थिती | VIDEO

Crime: आधी दारू पाजली, बिर्याणीही खाऊ घातली; नंतर महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केल्याने जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT