Post Office TD Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

Post Office Time Deposite Scheme: पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगले व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातून ४४,९९५ रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना

फक्त व्याजातून मिळणार ४४,९९५ रुपये

सुरक्षित गुंतवणूक अन् चांगला परतावा देणारी योजना

अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर आता अनेक बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. असं असलं तरीही पोस्ट ऑफिसने आपल्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. या योजनांवर आधीसारखेच चांगले व्याजदर मिळते. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा हा मिळणारच आहे.

फक्त व्याजातून मिळणार ४४,९९५ रुपये

दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिसच्या व्याजदरात बदल केला जातो. या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही १ लाख रुपये जमा करुन जबरदस्त व्याज मिळवू शकता. तुम्ही १ लाखांवर फक्त ४४,९९५ रुपयांचे व्याजदर मिळवू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही गुंतवणूक करु शकतात. १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी टाइम डिपॉझिटसाठी खाते उघडू शकतात. हे खाते बँकांच्या एफडीप्रमाणेच काम करते. या योजनेत मॅच्युरिटीनंतर व्याजासह रक्कम परत मिळते.

बँकेच्या एफडीवर जसे व्याज मिळते तसेच पोस्टाच्या योजनेतदेखील मिळते. या योजनेच्या व्याजदरात नेहमी कोणताही बदल होत नाही. १ वर्षांसाठी टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर ७ टक्के तर ३ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर ७.१ टक्क्यांवर व्याज मिळते. ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर ७.५ टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटमध्ये तुम्ही १ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर ४४,९९५ रुपयांचे व्याज मिळणार आहे. या योजनेत ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण १,४४,९९५ रुपये मिळणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना खूप फायदा होणार आहे.

देशातील कोणतीही बँक ७.५ टक्के व्याजदर देत नाही. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत सर्वाधिक व्याजदर दिले जाते. सर्व वयोगटातील नागरिकांना समान व्याज दिले जाते. त्यामुळे सर्वांना सेम फायदा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Apply Mascara: मस्कारा लावताना या 5 चुका टाळा; डोळे दिसतील टप्पोरे आणि सुंदर

Bank Election 2026 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जाहीर, RBIच्या निर्देशांमुळे जुने संचालक अडचणीत; वाचा सविस्तर

Gautam Gambhir: इंदूरच्या मैदानावर लागले 'गौतम गंभीर हाय-हाय'चे नारे; चाहत्यांचा संताप पाहता विराटने केलं असं कृत्य की...! Video viral

Skin Care : मेकअप न करताही मिळेल चेहऱ्यावर गुलाबी चमक, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT