Sukanya Samriddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची खास योजना! फक्त व्याजातून कमवा ५० लाख; कॅल्क्युलेशन वाचा

Sukanya Samriddhi Yojana Get 50 Lakh from Interest: पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेतून तुम्ही लाखो रुपयांचे व्याज मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला व्याजातून ५० लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना

फक्त व्याजातून मिळणार ५० लाख रुपये

गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन वाचा

प्रत्येकजण आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे, या दृष्टीने आधीपासूनच आर्थिक बचत करत असतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यातील काही सरकारी योजनांमध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कमेपासून गुंतवणूक करायची असते. अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला लाखो रुपये मिळतात. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्ही फक्त व्याजातून ५० लाख रुपये कमवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या नावाने अकाउंट उघडू शकतात. १५ वर्षांच्या मुलींपर्यंतचे अकाउंट तुम्ही उघडू शकतात. या योजनेत मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी गुंतवणूक करा. या योजनेत तुम्हाला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक बंद करायची आहे. तुम्हाला मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत व्याज मिळते. याच व्याजातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक व्याज दिले जाते. या योजनेत ८.२ टक्के व्याज मिळते. या योजनेत तिमाही आधारावर व्याजदर निश्चित केले जाते. या योजनेत जून ते मार्चदरम्यान व्याजदर तेच ठेवण्यात आले आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी २५० रुपयांपासून ते १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. एका वर्षात तुम्ही विविध हप्त्यांमध्ये पैसे जमा करु शकतात. तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. परंतु २१ वर्षानंतरच हे खाते मॅच्युअर होते आणि मुलींना पैसे मिळतात.

व्याजातून मिळणार ५० लाख (Sukanya Samriddhi Yojana Get 50 Lakh Interest)

जर तुम्ही मुलीच्या जन्मापासून या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखो रुपयांचे व्याज मिळते. या योजनेत वर्षाला १.५ लाख रुपये गुंतवायचे आहे. २१ वर्षापर्यंत तुम्हाला ७१ लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत दर वर्षी १.५० लाख रुपये गुंतवायचे. १५ वर्षासाठी तुम्ही एकूण २२,५०,००० रुपये गुंतवणार आहे. त्यावर २१ वर्षांसाठी ८.२ टक्के व्याजदराने तुम्हाला ४९,३१,११९ रुपये मिणार आहे. या योजनेत तुम्हाला २१ वर्षानंतर एकूण ७१,८२,११९ रुपये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: कोणत्या गोष्टींचा जास्त मोह ठेवू नये? जाणून घ्या जीवनाचं कडू सत्य

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

SCROLL FOR NEXT