Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! दोन वर्षात महिला होणार लखपती; कसं?जाणून घ्या सविस्तर

Post Office Scheme For Women: पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी खास योजना राबवण्यात आली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवणूक केल्यास महिलांना भरघोस परतावा मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. महिलांसाठी पोस्ट ऑफिसची एक खूप चांगली योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास महिलांना दोन वर्षात चांगला परतावा मिळणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे. महिलांना गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळवून देण्यासाठी ही योजना आहे. २०२५ पर्यंतच ही योजना सुरु ठेवण्यात येणार आहे. या योजनेत कोणत्याही वयोगटातील महिला खाते उघडू शकतात. याशिवाय पालक आपल्या मुलींसाठीदेखील काते उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना ७.५ टक्के व्याज देण्यात येणार आहे. प्रत्येक तिमाहित हे व्याज देण्यात येते. मॅच्युरिटीनंतरच हे व्याजदर देण्यात येणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास अर्जदारांना आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. परंतु तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. यावर टीडीएसदेखील कापला जाईल.

जर तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत जर तुम्ही २ वर्षांसाठी २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २.३२ लाख रुपये मिळतील. ही योजना एफडीसारखी काम करते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज दाखल करु शकतात.

तुम्हाला या योजनेत दोन खाती उघडायची असेल तर त्यात ३ महिन्यांचे अंतर असावे. खाते उघडल्यावर एका वर्षानंतर तुम्हाला ४० टक्के पैसे काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT