Mahila Bachat Gat : होतकरू बहिणी रोजगारापासून वंचित, BMC निविदांचा निकाल कधी जाहीर करणार? महिला बचत गट प्रतिक्षेत

Mahila Bachat Gat update : BMC शालेय पोषण आहार वाटपाच्या निविदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे होतकरू बहिणी रोजगारापासून वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी महिला बचत गटांनी केली आहे.
होतकरू बहिणी रोजगारापासून वंचित, BMC निविदांचा निकाल कधी लावणार? महिला बचत गट प्रतिक्षेत
BMC Saam TV
Published On

मुंबई : शालेय पोषण आहार देण्याचे काम मुंबई महापालिकेने विविध महिला बचत गटांना सोपावलं आहे. या कामासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवली जाते. या पोषण आहार वाटपासाठी फेब्रुवारी,२०२४ महिन्यात निविदा काढली होती. मात्र, या निविदा प्रक्रियेचा निकाल ५ महिने उलटून गेले तरी जाहीर करण्यात आलेला नाही. महापालिका प्रशासनाच्या या कारभारामुळे पोषण आहारासाठी किचन भाड्याने घेतलेल्या महिला बचत गटांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी शालेय आणि अंगणवाडी आहार पुरवठादार संघटनेने लावून धरली आहे.

मुंबईत शालेय आहार पोषण वाटपासाठी गरीब होतकरु महिला संस्था आणि बचतगटांनी निविदा अर्ज भरले आहेत. मार्च महिन्यात निविदा अर्ज भरूनही अद्याप निविदांचा निकाल न लावल्याने महिला संस्था आणि महिला बचत गटाचा संताप वाढू लागला आहे. निविदा अर्ज भरल्यानंतर या महिला संस्था आणि बचत गटांनी किचन भाडेतत्वावर घेतल्याने अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. यासाठी काही संस्थांनी कर्जही काढल्याची माहिती बचत गटांनी दिली आहे. त्यामुळे महिला बचत गटावर कर्जाचा ताणही येत असल्याचे त्यांनी सांगितले.

होतकरू बहिणी रोजगारापासून वंचित, BMC निविदांचा निकाल कधी लावणार? महिला बचत गट प्रतिक्षेत
Mahila Bachat Gat : Government Scheme : महिला बचत गटांना मिळणार कृषी ड्रोन

महिला बचत गटाचं म्हणणं काय?

शालेय व अंगणवाडी आहार पुरवठादार संघटनेच्या संगीता कांबळे म्हणाल्या की, 'शासन एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत आहेत. तर दुसरीकडे होतकरू बहिणींना रोजगाराच्या हक्कांपासून वंचित ठेवल जात आहेत. या निविदांचा निकाल लवकर जाहीर करावा. या निविदेनंतर किचनसाठी खर्च होत असल्याने महिला कर्जबाजारी होऊ लागल्या आहेत'.

होतकरू बहिणी रोजगारापासून वंचित, BMC निविदांचा निकाल कधी लावणार? महिला बचत गट प्रतिक्षेत
Train Ticket Confirmation: खुशखबर! ट्रेनच्या वेटिंग तिकीटाचं टेन्शन संपलं; कधीपासून मिळणार कन्फर्म तिकीट? जाणून घ्या

...अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन करू, संघटनेचा इशारा

'मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ओळख आणि वशिला नसलेल्या संस्थांना निविदा प्रक्रियेतून डावलले जात आहेत. त्यामुळे सरकारने लक्ष देऊन भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच लवकर निविदेसाठी पात्र आणि अपात्र संस्थांची यादी जाहीर करून बचत गटांना काम द्यावे.या प्रक्रियेत वेळ दवडू नये अन्यथा महिला बचत गट बेमुदत ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा शालेय आणि अंगणवाडी आहार पुरवठादार संघटनेने दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com