Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: दररोज ४०० रुपये गुंतवा अन् २० लाख मिळवा; पोस्टाच्या या योजनेच मिळणार जबरदस्त परतावा

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला दररोज फक्त ४०० रुपये गुंतवायचे आहेत.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना

दररोज ४०० रुपये गुंतवा अन् २० लाख मिळवा

गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन वाचा

प्रत्येकजण गुंतवणूकीसाठी चांगला ऑप्शन शोधत असतात. गुंतवणूक करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये. भविष्यात दर महिन्याला पैसे मिळावे, यासाठी अनेक योजना आहेत. यातील एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट. बचत करण्यासाठी ही उत्तम योजना आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला २० लाख रुपये मिळू शकतात. या योजनेत रोज फक्त ४०० रुपये गुंतवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला चांगली रक्कम मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस योजनेच्या व्याजदरात दर तीन महिन्यांनी बदल होत असतो. या योजनेत सध्या ६.७० टक्के व्याजदर मिळत आहे. योजनेत फक्त १०० रुपये भरुन तुम्ही अकाउंट ओपन करु शकतात.या योजनेत रोज ४०० रुपये गुंतवू शकतात. त्यानंतर तुम्हाला २० लाख रुपये मिळणार आहे.

५ वर्षांसाठी करा गुंतवणूक

या योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या नावानेदेखील अकाउंट उघडू शकतात. हे खाते त्यांच्या आईवडिलांद्वारे चालवले जाते. या योजनेत १८ वर्षानंतर केवायसी केल्यानंतर अकाउंड अपडेट होईल.

कॅल्क्युलेशन

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला दररोज ४०० रुपये गुंतवायचे आहे. म्हणजेच महिन्याला तुम्ही १२००० रुपये गुंतवणार आहात. यानंतर पाच वर्षात तुम्ही ८,५६,३८८ रुपये गुंतवणार आहात. जर तुम्ही अजून ५ वर्ष गुंतवणूक केली तर एकूण १४.४० लाख रुपये गुंतवणार आहात. त्यावर तुम्हाला ६,१०,२४८ रुपयांचे व्याज मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला एकूण २०,५०,२४८ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT