Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office RD Scheme: ३३३ रुपये गुंतवा अन् १७ लाख मिळवा; पोस्टाची जबरदस्त योजना

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसरची रिकरिंग डिपॉझिट योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर व्याजासोबतच चक्रव्याढ व्याजदेखील मिळते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित जावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडते. जर तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट ही उत्तम योजना आहे. यामध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. या योजनेतील गुंतवणूक ही सर्वांसाठीच फायद्याची असते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही १७ लाख रुपये जमा करु शकतात. जर तुम्ही रोज ३३३ रुपये जमा केले तर लाखो रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला भरघोस परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत कोणतीही रिस्क नाही आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला आठवणीने गुंतवणूक करायची असते. जर तुम्ही विसरलात तर प्रत्येक महिन्याला १ टक्के दंड भरावा लागले. फक्त ४ महिने ही सूट दिली जाते. त्यानंतर तुमचे खाते बंद केले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला १०० रुपये भरुन खाते उघडायचे असते. सिंगल किंवा जॉइंट अकाउंट तुम्ही उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला ६.८ टक्के व्याजदर मिळते. याचसोबत चक्रव्याढ व्याजदेखील मिळते.

कॅल्क्युलेशन

या योजनेत तुम्ही रोज ३३३ रुपये गुंतवले तर महिन्याला १०,००० रुपये गुंतवणार आहेत. म्हणजेच वर्षाला १.२० लाख रुपयांची बचत कराल. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी तुम्ही ५,९९,४०० रुपये जमा करणार आहात. त्यावर ६.८ टक्के चक्रव्याढ व्याज म्हणजे १,१५,४२७ रुपयांचे ७,१४,८२७ रुपये होणार आहे.

यानंतर पाच वर्षांच्या कालावधी तुम्ही वाढवू शकतात. १० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हा १२,००,००० रुपये गुंतवणार आहे. यावर मिळणारे व्याज ५,०८,५४६ असणार आहे.म्हणजेच तुम्गाला दहा वर्षानंतर १७,०८,५४६ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT