Post Office Recurring Deposit Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसची धडाकेबाज योजना! महिन्याला 5000 रुपये जमा करा, इतक्या दिवसात मिळणार 8 लाखांहून अधिक रुपये...

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसची धडाकेबाज योजना! महिन्याला 5000 रुपये जमा करा, इतक्या दिवसात मिळणार 8 लाखांहून अधिक रुपये...

साम टिव्ही ब्युरो

Post Office Recurring Deposit Scheme (Explain in Marathi):

जर तुम्हाला गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल आणि सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यातच पोस्ट ऑफिसच्या बचत योजना चांगला पर्याय ठरू शकतो. कारण यात गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यापैकी एक Post Office Recurring Deposit आहे, जी हमी सुरक्षिततेसह उत्कृष्ट परतावा देते.

सरकारने वाढवले व्याजदर

नुकतेच पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेवर गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या व्याजाचे दर केंद्र सरकारने वाढवले ​​आहेत. जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी सरकारने व्याजदर 6.2 टक्क्यांवरून 6.5 टक्के केले आहेत.

म्हणजेच Post Office Recurring Deposit च्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या बचत योजनेतील गुंतवणूक आता अधिक फायदेशीर ठरत आहे. (Latest Marathi News)

100 रुपयांपासून गुंतवणूक होते सुरू

केंद्र सरकार आपल्या बचत योजनांचे व्याज दर तिमाही आधारावर सुधारित करते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पोस्ट ऑफिसच्या Recurring Deposit योजनेत एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. ही योजना घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे ठेवण्यात आली आहे. म्हणजेच यापेक्षा मोठी व्यक्ती गुंतवणूक करू शकते.

नातेवाईक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने यात गुंतवणूक करू शकता. तसेच यात संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत खाते उघडून तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यात 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल.

जर तुम्ही हिशोब बघितला तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनते खात्यात दरमहा 5,000 रुपये निश्चित रक्कम जमा केली आणि ही प्रक्रिया संपूर्ण 10 वर्षे चालू ठेवली, तर तुमच्या ठेवीवर सध्याच्या 6.5 टक्के व्याज मिळेल. जे 2.46 लाख रुपये इतके होते. तसेच तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम 6 लाख रुपये असेल. त्यानुसार तुम्हाला 10 वर्षांनंतर 8.46 लाख रुपये मिळतील. आता या दरम्यान सरकारने जर सुधारणा करून व्याजदर वाढवले ​​तर त्यानुसार तुम्हाला मिळणारे व्याजही वाढेल आणि जास्त पैसे तुम्हाला मिळणार.

खातेदाराला कर्जाची सुविधा

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनी बंद केले जाऊ शकते. त्याचबरोबर गुंतवणूक सुरू केल्यानंतर एक वर्षानंतर 50 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधाही दिली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत खाते उघडल्यानंतर 12 महिने हप्ते जमा केले, तर त्याच्या आधारावर बँकांकडून कर्ज मिळू शकते. या योजनेत तुम्ही तुमच्या एकूण ठेवीवर अर्धी रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: बेस्टच्या 150 नवीन इलेक्ट्रॉनिक बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा लवकरच

Blood Transfusion: शरीरात चुकीच्या 'ब्लड ग्रुप'चे रक्त चढवल्यास काय होते?

The Family Man 3: द फॅमिली मॅन सीझन ३ होणार 'या' दिवशी प्रदर्शित; हे दोन सुपरस्टार दिसणार खास भूमिकेत

Blood Sugar: सावधान! शुगर वाढण्यामागील कारण फक्त जेवण नव्हे; तज्ज्ञांनी सांगितल्या ५ चुकीच्या सवयी, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT