Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पैसे मिळणार आहेत.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना

दररोज गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

पोस्टाच्या या योजनेत मिळतोय भरघोस परतावा

प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. भविष्यात सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळावी, यासाठी आतापासूनच गुंतवणूक करायला हवी. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही,

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office RD Scheme)

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. याचसोबत सुरक्षेची गॅरंटी असणार आहे. कोणत्याही रिस्कशिवाय तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्ही २०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही कितीही वर्ष गुंतवणूक करु शकतात. १ , २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला तिमाही आधारावर व्याज मिळते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अकाउंट उघडू शकतात. १८ वर्षांखालील मुलाचे अकाउंट त्यांच्या आईवडिलांच्या नावावर उघडू शकतात. या योजनेत तुम्ही लोनदेखील घेऊ शकतात. या योजनेत तुम्ही जमा केलेल्या रक्कमेच्या ५० टक्के रक्कमेचं लोन मिळवू शकतात. हे लोन १२ हप्त्यांमध्ये द्यावं लागणार आहे.

कॅल्क्युलेशन (Post Office RD Scheme Calculation)

या योजनेत जर तुम्ही दर दिवशी २०० रुपये गुंतवले तर महिन्याला ६००० रुपये गुंतवणार आहात. यावर तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळेल. दर तुम्ही दोन वर्षांसाठी ही गुंतवणूक केली तर तुम्ही १,४४,००० रुपये जमा कराल. त्यावर १०,११२ रुपये व्याज मिळणार आहे. तुम्हाला एकूण १,५४,११२ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT