post office rd scheme 
बिझनेस

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

Savings Plan: दररोज ३०० रुपये वाचवून पोस्ट ऑफिस RD योजनेत गुंतवणूक केल्यास १० वर्षांत १५ लाखांहून अधिक फंड तयार होतो आणि ४.४० लाख व्याज मिळते, सुरक्षित सरकारी योजना आहे.

Sakshi Sunil Jadhav

पैसा हातात आला की, अनेक खर्च डोळ्यासमोर येतात. जे महत्वाचे असतात. पण त्यातून थोडी बचत करुन तुम्ही भविष्यात खूप मोठ्या गोष्टी मिळवू शकता. तुमच्यासाठी सरकारने पोस्ट ऑफीसद्वारे काही योजना सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही भविष्यात खूप मोठी रक्कम मिळवू शकता.

पोस्ट ऑफीस रेकरिंग डिपॉडिट स्कीम (Post Office Recurring Deposit Scheme) ही छोट्या गुंतवणूकीसाठी बेस्ट स्कीम आहे. तुम्हाला यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या किंमतीवर ४.४० लाख रुपये व्याज मिळू शकतं. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेऊयात.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही या योजनेत कोणत्याही वयात गुंतवणूक करू शकता. ही Zero Risk Scheme आहे. त्यामुळे काळजी घ्यायची गरज नाही. Post Office RD Scheme मध्ये तुम्हाला सरकारकडून ६.७ टक्के व्याज ऑफर केलं जातं. यामध्ये तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. यासाठी तुमचे वय हे १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तुम्हाला यात गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या पोस्टात जाऊन खातं खोलावं लागेल. या योजनेची मॅच्युरीटी ५ वर्षांनी करता येते. पण तुम्हाला जर आणखी दिवसांसाठी यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकता. याचसोबत Post Office RD Scheme मध्ये मॅच्युरिटी होण्याआधी खातं बंद करु शकता.

तुम्ही या योजनेत जर ३०० रुपये दिवसाला गुंतवत असाल तर १५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा निधी गोळा करु शकता. म्हणजे तुमचे महिन्याला ९००० होतात. तसेच जर तुम्ही १० वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही एकूण १०,८०,००० गुंतवता. तसेच याची एकूण मॅच्युरिटी ही १५,२०,८८९ रुपये इतकी होते. याचे व्याज हे ४,४०,८८९ रुपये होतं. म्हणजेच सरकार तुम्हाला एकूण ४.४० लाखांचे व्याज मिळते. ही सगळ्यात मोठी रक्कम तुम्हाला छोट्या गुंतवणूकीतून मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT