Post Office NSC Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office NSC Scheme: पाच वर्षात फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

Post Office National Saving Certificate Scheme: पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही फक्त व्याजातून ४.५० लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम

फक्त व्याजातून मिळणार ४.५० लाख रुपये

५ वर्षांच्या कालावधीसाठी करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या अनेक लहान बचत योजना आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कमीत कमी गुंतवणूकीत जबरदस्त परतावा मिळतो. या योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळणार आहे. कोणत्याही रिस्कशिवाय तुम्हाला गुंतवणूक करता येणार आहे. पोस्टाची ही योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा लॉक इन पीरियड कालावधी ५ वर्षांचा असणार आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (Post Office)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही स्मॉल सेव्हिंग स्कीम योजना आहे. या योजनेत मध्यमवर्गीयांना आणि सर्वसामान्यांना गुंतवणूक करता येणार आहे.या योजनेत फक्त भारतातील नव्हे तर एनआरआयदेखील योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत २ ते ३ जण एकत्र मिळूनदेखील अकाउंट उघडू शकतात. या योजनेत अल्पवयीन मुलांच्या नावे त्यांचे पालक अकाउंट उघडू शकतात.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. कलम 80C अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीर टॅक्स बेनिफिट मिळते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत ७.७ टक्के व्याजदर मिळत आहे. या योजनेत कोणताही नागरिक १० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत ५ वर्षात तुम्हाला फक्त व्याजातून ४,४९,०३४ रुपये मिळणार आहे. यामुळे तुम्हाला वर्षानंतर एकूण १४,४९,०३४ रुपये मिळणार आहे. पहिल्या वर्षी ७७००० रुपये व्याज, दुसऱ्या वर्षी १,५९,९२९ रुपये, तिसऱ्या वर्षी २,४९,०४४ रुपये तर चौथ्या वर्षी ३,४५,६२० रुपये व्याज मिळणार आहे. चौथ्या वर्षी एकूण ४,४९,०३४ रुपये व्याजदर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live: वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदावर एमआयएमचा झेंडा

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

बांगलादेश पुन्हा पेटलं; जमावाने नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT