POMIS Scheme Saam Tv
बिझनेस

POMIS Scheme : पती-पत्नी कमावू शकतात लाखो रुपये, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक

POMIS Scheme For Couple : कमी पैशात योग्य प्रकारे गुंतवणूक करुन अधिक पैसे कमवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनेसाठी पती-पत्नीला एकत्र खाते उघडावे लागेल. पोस्ट ऑफिस योजनेच्या परतावा मिळवण्यासाठी हमी सरकार देते.

कोमल दामुद्रे

Post Office Scheme:

आपल्यापैकी अनेकांना भविष्याची चिंता सतावू लागते. अशातच जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल तर तुम्हाला पैशांची अधिक चिंता जाणवू लागते. वाढत्या महागाईमुळे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आपण शोधतो. त्यासाठी आपण अनेक योजनांमध्ये देखील गुंतवणूक करतो.

आपले पैसे (Money) दुप्पट व्हावे यासाठी आपण गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करतो. जर तुम्हाला कमी पैशात योग्य प्रकारे गुंतवणूक करुन अधिक पैसे कमवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करु शकता.

या योजनेसाठी पती-पत्नीला एकत्र खाते उघडावे लागेल. पोस्ट ऑफिस योजनेच्या परतावा मिळवण्यासाठी हमी सरकार देते. त्यासाठी या ठिकाणी गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. यासाठी तुम्ही महिन्याला पैसे गुंतवणू शकता.

POMIS मध्ये पैसे जमा केल्याने तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतात. या योजनेच्या मॅच्युरिटी ५ वर्षांची असून त्यात सिंगल किंवा जॉइंट खाते (Bank Account) उघडता येते. तसेच या महिन्यात मिळणारे व्याजदर हे ऑक्टोबर महिन्यापासून वाढवण्यात आले. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.४ टक्के दराने व्याज दिले जाईल. प्रत्येक तीन महिन्यानंतर सरकारकडून POMIS च्या व्याजात बदल होतो.

1. गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करत असाल आणि त्यात एकच खाते उघडण्याचा विचार करत असाल तर फक्त ९ लाख रुपये जमा करता येतील. जर पती-पत्नीने जॉइंट खाते उघडले असेल तर १५ लाख रुपये भरता येतील.

2. नियम काय?

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केली आहे आणि १ते ३ वर्षात पैसे काढत असाल तर तुम्हाला २ टक्के व्याज वजा करुन रक्कम मिळेल. जर तुम्ही ३ वर्षानंतर पैसे काढायचे असतील तर ठेव रकमेच्या १ टक्के वजा करुन तुम्हाला पैसे परत केले जातील.

3. ५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळेल?

तुम्ही या योजनेत ५ लाखांची गुंतवणूक केली तर ५ वर्षांमध्ये तुम्हाला वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळेल. यामध्ये तुम्हाला दरमाह व्याजातून ३,०८४ रुपये मिळतील. त्याच वेळी एकूण व्याज १, ८५,००० रुपये असेल. याचा अर्थ असा की, तुम्ही ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर मॅच्युरिटीवर फक्त १,८५,००० रुपये व्याज मिळेल. तसेच दर महिन्याला ३००० पेक्षा जास्त रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT