Kisan Vikas Patra Scheme Saam Tv
बिझनेस

Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

Kisan Vikas Patra Scheme Benefits: प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दुप्पट पैसे मिळणार आहेत.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारच्या अनेक योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला नफा मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही पैसे गुंतवल्यावर काही महिन्यात तुमचै पेसे दुप्पट होणार आहेत.

पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस व्याज मिळणार आहे. या योजनेत तुमचे पैसे काही महिन्यांनी दुप्पट होणार आहे. या योजनेत गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हवे तितके पैसे या योजनेत गुंतवू शकतात.

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्ही वैयक्तिक आणि दुहेरी असे दोन्ही अकाउंट उघडू शकतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांच्या नावाने तुम्ही खाते उघडू शकतात. एखादा व्यक्ती या योजनेअंतर्गत कितीही खाते उघडू शकतो.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत व्याजदर तिमाही आधारावर ठरवले जाते. या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याज वार्षिक आधारावर दिले जाते.

या योजनेत जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीनंतर म्हणजेच ११५ महिन्यांपर्यंत ७.५ टक्के व्याजदराच्या आधारावर ५ लाख रुपये मिळतील. म्हणजेच ५ लाख रुपये गुंतवल्यावर तुम्हाला १० लाख रुपये मिळतील. या योजनेबाबत सर्व माहिती तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

SCROLL FOR NEXT