Post Office Scheme
Post Office scheme Saam TV
बिझनेस

Government Scheme: ५ लाखांची गुंतवणूक करा अन् काही महिन्यांनी १० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत आजच गुंतवणूक करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारच्या अनेक योजना असतात. सरकारच्या या योजनेत कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळतो. याचसोबत पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यास धोका कमी असतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये आपल्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर आपले पैसे मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशी योजना सांगणार आहोत. ज्यात गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होणार आहे. नागरिकांना जास्त नफा मिळवून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत तुमचे पैसे काही महिन्यातच दुप्पट होतात. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

किसान विकास पत्र योजनात तुम्ही एक किंवा दोन खाते उघडू शकतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेदेखील तुम्ही खाते उघडू शकतात. तुम्ही या योजनेत कितीही खाती उघडू शकतात. यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिसच्या योजनेअंतर्गत व्याज हे तिमाहीच्या आधारावर ठरवले जाते. पोस्ट ऑपिसच्या या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याज वार्षिक आधारावर असते.

या योजनेत जर कोणी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत म्हणजे ११५ महिन्यांपर्यंत या योजनेत तुम्हाला १० लाख रुपये मिळतील. या योजनेवर कर लागू होतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय असायला हवा. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असवाते. तसेच या योजनेत पौढ व्यक्ती आपल्या लहान मुलाच्या वतीनेदेखील अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतो. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठक

Lasalgaon Accident : दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना अपघात; सीमा शुल्क विभागाचा चालक ठार, २ पोलीस कर्मचारी जखमी

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर पावसाचा हाहाकार; रेल्वे ठप्प, प्रवाशांचे झाले हाल

Mumbai Rain Viral Video: पाण्यातून रेल्वेचा प्रवास! चुन्नाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पुरासारखं पाणी साचलं; VIDEO पाहाच

NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजित दादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?

SCROLL FOR NEXT