POCO X6 5G Saam Tv
बिझनेस

POCO X6 5G च्या किंमतीत मोठी कपात, 12GB RAM आणि 512GB स्टोरेज फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

POCO X6 5G Price Drop: POCO X6 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने मोठी कपात केली आहे. कंपनीने याच्या 8GB रॅम आणि 256GB व्हॅरिएंटनंतर 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध फोन उत्पादक कंपनी POCO ने वर्षाच्या सुरुवातीला भारतात आपल्या स्मार्टफोन POCO X6 5G लॉन्च केला होता. हा फोन Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आणि हाय-रिझोल्यूशन AMOLED डिस्प्लेसह येतो.

अलीकडेच कंपनीने याच्या 8GB रॅम आणि 256GB व्हॅरिएंटच्या किंमती कमी केली होती. त्यानंतर हा फोन ग्राहकांना 17,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला. यानंतर आता कंपनीने याच्या 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज मॉडेलच्या किंमतीही कमी केल्या आहेत. याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

POCO X6 5G ऑफर आणि किंमत

POCO X6 5G चा 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल कंपनीने 24,999 रुपयांना लॉन्च केला होता. हा फोन सध्या Amazon India वरून फक्त 21,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. याच्या किंमतीतील कपात व्यतिरिक्त Amazon ग्राहकांना ICICI किंवा HDFC बँक कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 1,000 रुपयांची सूटही देत आहे. ज्यामुळे या फोनची किंमत 20,999 रुपये होईल.

कंपनीने याच्या 8GB/ 256GB मॉडेल 21,999 रुपयांना आणि 12GB/ 256GB स्टोरेज मॉडेल 23,999 रुपयांना लॉन्च केला होता. मात्र ऑफर अंतर्गत याची किमती अनुक्रमे 17,999 आणि 18,999 रुपये झाली आहे.

Poco X6 5G 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरसह 6.67-इंच AMOLED डिस्प्ले मिळतो. यासोबतच यामध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 सह येतो आणि यात लवकरच HyperOS अपग्रेड अपेक्षित आहे.

फोटोग्राफीसाठी या Poco फोनमध्ये OIS सह 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. यासोबतच यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. हा फोन IP54-रेटिंगसह येतो. कंपनीने यात 67W फास्ट चार्जिंगसह 5,100mAh बॅटरी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT