12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

Upcoming Smartphones 2024: Honor 200 Pro हा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च
Honor 200 ProSaam Tv

Honor चा नवीन Honor 200 Pro स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. हा Honor 200 सीरीजचा एक भाग आहे, जो पहिल्यांदा चीनमध्ये लॉन्च झाला होता. कंपनीने या फोनच्या भारतात लॉंचिंगबद्दल आधीच माहिती दिली होती आणि हा फोन एक्सक्लुझिव्हली ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Honor 200 Pro फोन BIS सर्टिफिकेशनवरही दिसला आहे.

Honor 200 Pro स्पेसिफिकेशन

BIS सर्टिफिकेशनवर याबद्दल अनेक माहिती उघड झाली आहे. Honor 200 Pro चा मॉडेल क्रमांक ELP-NX9 आहे. या फोनला 24 जून 2024 रोजी भारतात लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. कंपनी लवकरच देशात याचा स्टँडर्ड मॉडेल लॉन्च करणार आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट आहे, जो ग्राफिक्ससाठी Adreno GPU सह कनेक्ट केलेला आहे.

12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च
Vivo X90 Series: 50MP IMX866 चा कॅमेरा, 512GB UFS 4.0 स्टोरेज; Vivo X90 सीरीज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

डिस्प्ले

फोनचा चिपसेट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येऊ शकतो. यात 120Hz रीफ्रेश रेट, 3840Hz PWM dimming आणि 4000nits पर्यंत पीक ब्राइटनेससह 6.78-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले ग्राहकांना मिळेल.

कॅमेरा

Honor 200 Pro मध्ये f/1.9 अपर्चर आणि OIS सह 50MP OmniVision OV50H सेन्सर, 2.5cm मॅक्रो पर्यायासह 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि OIS सह 50MP 2.5x पोर्ट्रेट टेलिफोटो Sony IMX856 सेन्सर ग्राहकांना मिळेल. सेल्फीबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या पुढील बाजूस 50MP Sony IMX 906 सेन्सर आणि 3D डेप्थ सेन्सर कॅमेरा आहे.

12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च
Airtel ने दिला ग्राहकांना झटका, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत केली मोठी वाढ; 38 कोटी लोकांना बसणार फटका

बॅटरी

Honor 200 Pro मध्ये 5,000mAh बॅटरी मिळेल. जी 100W फास्ट चार्जिंग स्पीड आणि 66W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनची कनेक्टिव्हिटी देखील चांगली आहे. फोनमधील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 802, 11ax Bluetooth 5.3, GPS, USB Type-c आणि NFC यांचा समावेश आहे आणि सुरक्षिततेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com