Farmer Pension Scheme Saam Tv
बिझनेस

PMKMY: शेतकऱ्यांना वृद्धपकाळात मिळते पेन्शन, 'ही' सरकारी योजना म्हातारपणात देईल आर्थिक आधार

Farmer Pension Scheme: प्रधानमंत्री किसान मानधन योजनेतून वेळेपूर्वी बाहेर पडल्यास, ग्राहकांना सह-योगदान दिले जाणार नाही. याप्रकरणात निधीच्या उत्पन्नासह सह-योगदान पेन्शन फंडात परत हस्तांतरित केले जाईल.

Bharat Jadhav

सरकारच्या एका योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणात त्यांना आर्थिक आधार देते. म्हणजे बळीराजाला त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन दिलं जातं. भारत सरकारची ही खास योजना आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन मिळते. ही योजना देशातील सर्व जमीनधारक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी (SMF) आहे. या योजनेतून 18 ते 40 वर्षे वयोगटासाठी ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना मिळत असते.

ही योजना 9 ऑगस्ट 2019 पासून लागू करण्यात आलीय. तुम्हीही पात्र शेतकऱ्यांच्या श्रेणीत येत असाल तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. प्रधानमंत्री किसान मान-धन योजना (PM-KMY) सर्व जमीनधारक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्ष गाठल्यावर 3000 रुपये मासिक पेन्शन दिली जातेय. लहान आणि सीमांत शेतकरी म्हणजे संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीनुसार 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी. या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

शेतकऱ्यांची श्रेणी

श्रेणी जमिनीचा आकार

सीमांत शेतकरी 1.00 हेक्टरपेक्षा किरकोळ कमी

लहान शेतकरी 1.00 - 2.00 हेक्टर

अर्ध-मध्यम शेतकरी 2.00 - 4.00 हेक्टर

मध्यम शेतकरी 4.00 - 10.00 हेक्टर

मोठे शेतकरी 10.00 हेक्टर आणि त्याहून अधिक

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल?

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही केंद्रीय सरकारची योजना आहे. ही योजना भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या भागीदारीतून चालवली जाते. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत योगदान देण्यासाठी त्यांचे PM-KISAN पैसे ज्या बँक खात्यात जमा केले जातात. त्या खात्याला ऑटो डेबिट करण्याची सहमती दिली पाहिजे. नामनिर्देशन-सह-ऑटो-डेबिट-आदेश फॉर्मवर स्वाक्षरी करून सबमिट केल्यास मानधन योजनेचे पैसे सहज भरले जातील.

55 ते 200 रुपये प्रति महिन्याचा हप्ता

दरम्यान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नाव नोंदवलं असेल आणि पेन्शन मिळण्याचे होण्याआधी योजना बंद केली तर त्या शेतकऱ्यांना सह-योगदान म्हणजेच पैसे दिले जात नाही. पीएम किसान योजनेचे पैसे सह-योगदान पेन्शन फंडात परत हस्तांतरित केले जातील. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांना वैयक्तिक SMF लाभार्थीच्या योगदानाचा भार वाटून घेण्याचा पर्याय असेल.

नावनोंदणीच्या तारखेनुसार दर महिन्याला त्याच दिवशी मासिक हप्ता द्यावा लागेल. लाभार्थी त्यांचे योगदान त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक पद्धतीने भरू शकतात. पेन्शनसाठी जेव्हा नाव नोंदणी केली असेल त्याच तारखेला हप्ता द्यावा लागतो. या योजनेसाठी आकारण्यात येणारा हप्ता हजारो रुपयांची नाहीये. अवघा 55 ते 200 रुपये प्रतिमहिना आहे. शेतकऱ्यांच्या वयानुसार मासिक योगदानाची रक्कम ठरत असते.

निश्चित तारखेपूर्वी ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, ग्राहकाच्या जोडीदारास योजनेअंतर्गत उर्वरित योगदान देऊन योजना सुरू ठेवण्याचा पर्याय असेल. जर अर्ज करणारा आधीच या योजनेचा लाभ घेत असेल त्यांना या योनजेचा लाभ घेता येणार नाही. योगदानाचा दर आणि वेस्टिंगची तारीख समान राहील. पुरुष असो किंवा स्त्री दोघांना समान पेन्शन देय असेल. वेस्टिंग तारखेनंतर जोडीदाराच्या मृत्यू झाला तर पेन्शनचा पैसा परत पेन्शन फंडात हस्तांतरित केला जाईल.

तुम्ही कुठे अर्ज करू शकता

तुम्ही ऑफलाइन पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्राला (CSC) भेट देऊन अर्ज करावा लागेल. तेथे तुम्हाला तुमची कागदपत्रे जमा करून योजनेसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही ऑनलाइन पर्याय निवडल्यास, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट maandhan.in ला भेट द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

SCROLL FOR NEXT