success story of pmc sanitation worker priyanka kamble saam tv
बिझनेस

Pune News : आता थांबायच नाय...! घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने क्रॅक केली SSCची परीक्षा

PMC News : पुणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी दहावीची परीक्षा देत घवघवीच यश प्राप्त केले आहे. स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करता-करता त्यांनी शाळा, अभ्यास आणि संसार अशी जबाबदारी सांभाळली.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

इयत्ता दहावीचा निकाल हा जाहीर झाला असून दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाला आहे.राज्यात तब्बल 211 विद्यार्थ्यांना शंभर पैकी 100 गुण हे मिळाले आहे.दहावीमध्ये यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. शिक्षण हे खऱ्या आयुष्याला समृद्ध करत आणि यामुळे माणसाच्या आयुष्यात बदल होत जातात ही बाब लक्षात घेत पुणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी देखील दहावीची परीक्षा देत घवघवीत यश प्राप्त केलं आहे.

काल दहावीचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी मोठ यश दहावीच्या परीक्षेत प्राप्त केलं आहे.अस असताना श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन चा चा निकाल 90% इतका लागला असून या परीक्षेस एकूण 10 विद्यार्थिनी परीक्षा दिली होती.त्यापैकी 9 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहे.ज्यात सुकन्या शिंदे हिने 70.40% गुण मिळवून प्रशालेमधे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर रेणुका कत्राबाद हिने 65.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेमधुन इयत्ता 10 वी च्या परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थीनींनी अतिशय मेहनतीने कष्टाने हे यश संपादित केल आहे.यात अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रियंका कांबळे जी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. तिने स्वच्छतेचे काम आणि शाळा,अभ्यास तसेच प्रापंचिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी सांभाळून तिने दहावीच्या परीक्षेत 47.60% मिळवले.

लहान असताना मी शिक्षण सोडून दिलं होतं.तेव्हा शिक्षणाचा काय महत्त्व आहे हे कळलं नव्हतं मात्र जसं जसं मोठं होत गेले तेव्हा शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे कळाल आणि म्हणतात ना शिक्षणाला कोणतंही वय नसतं आणि हीच बाब लक्षात घेता मी शिक्षण घ्यायचं विचार केल आणि श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल येथे शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि आठवी पासून तिथ शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मी महापालिकेत कात्रज परिसरात स्वच्छतेच काम करत असते हे काम करून हे शिक्षण पूर्ण केलं आहे.सकाळी परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन कचरा गोळा करून मुलाला शाळेत सोडून मी माझ्या शाळेत शिक्षणासाठी जात होते.दहावीच्या परीक्षेला देखील मी कामावर जाऊन परीक्षेला जात होते.आणि या काळात मला माझ्या आईने मदत केली असल्याचं यावेळी कांबळे हिने सांगितल. आयुष्यात एखादी गोष्ट अशी घडते ज्याने खूप काही बदलून जातं तशीच परिस्थिती माझ्या बाबत देखील झाली आणि माझं आणि माझ्या नवऱ्याच भांडण झालं आणि आम्ही वेगळं राहू लागलो मी माझ्या आईकडे राहिला आले आणि मग मुलाला घेऊन वेगळ राहिला गेले.आपल्याला काहीतरी केल पाहिजे हा विचार मला नेहेमी येत होता आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर शिक्षण घ्यावं लागेल आणि हीच बाब लक्षात घेत मी शिक्षण घ्यायच विचार केल आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली काल दहावीचा निकाल लागल्यानंतर मला खूपच आनंद होत असल्याचे यावेळी प्रियंका कांबळे हिने सांगितले.

अनेक वर्षांच्या शैक्षणिक गॅप नंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊन काल अनेक लोक हे शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे.अस असताना पुण्यातील प्रियंका कांबळे हिने मिळवलेल्या यशाच्या बाबत तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT