PM Vidyalakshmi Yojana Saam Tv
बिझनेस

PM Vidyalakshmi Yojana: विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास योजना! शिक्षणासाठी १० लाखांचं कर्ज; जाणून घ्या पात्रता

PM Vidyalakshmi Yojana Eligibility And Application Process: पीएम विद्यालक्ष्मी योजनेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत कमी व्याजदरात एज्युकेशन लोन दिले जाते.

Siddhi Hande

प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे खूप गरजेचे असते.शिक्षणाने आपण खूप काही बदलू शकतो. स्वतःमध्येही आपण अनेक बदल करतो. अनेकजणांना उच्च शिक्षण घ्यायचे असते परंतु काही अडचणींमुळे तुम्हाला शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने खास प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एज्युकेशन लोन मिळते.

पीएम विद्यालक्ष्मी योजना (PM Vidyalakshmi Yojana)

पीएम विद्यालक्ष्मी योजनेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज दिले जाते.या योजनेत तुम्हाला कमी व्याजदरात शिक्षणासाठी लोन मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी मदत मिळते.

आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळेच ही योजना राबवली आहे. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत लोन मिळते.

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार आहे. ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ७५ टक्के सरकारची क्रेडिट गॅरंटी मिळते. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जर ४.५ लाखांपेक्षा कमी असेल तर व्याज द्यावे लागत नाही. ४.५ ते ८ लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना ३ टक्के व्याजदरात सवलत मिळते. या योजनेत कर्जाचा परतफेडीचा कालावधी १५ वर्षे असणार आहे.

पात्रता (PM Vidyalakshmi Yojana Eligibility)

देशातील टॉप ८६० उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी, मेरिट किंवा परीक्षेच्या आधारे निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच हे लोन मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत असावे.१०वी आणि १२वी उत्तीर्ण विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत वर्षभरात १ लाख विद्यार्थ्यांना कर्ज मिळते.

कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, १०वी आणि १२वीचे मार्कशीट, प्रवेश पत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि अर्जाचा फॉर्म हे कागदपत्रे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला https://pmvidyalaxmi.co.in/ या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर स्टुडंट लॉग इन वर जाऊन नवीन अकाउंट बनवा.

यानंतर Apply for Education Loan वर क्लिक करा.

यानंतर कागदपत्रे भरुन फॉर्म अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT