PM Surya Ghar Yojana Saam Tv
बिझनेस

PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनेल, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज अन् ७८००० रुपयांची सब्सिडी; सरकारची सूर्य घर योजना आहे तरी काय?

PM Surya Ghar Free Electrticity Yojana News: केंद्र सरकारने पीएम सुर्य घर योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला मोफत वीज आणि ७८००० रुपयांची सब्सिडी मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारची पीएम सुर्या घर योजना

मोफत वीज आणि ७८००० रुपयांची सब्सिडी

नागरिकांसाठी बेस्ट योजना

सध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसात अनेकजण घरात हिटर बसवतात. यामुळे वीजेचे बिल वाढते. याचसोबत रोजच्या वापरातील एसी, फ्रिज, मिक्सर या उपकरणांमुळे वीजबिल नेहमीच वाढत असते. जर एखाद्या महिन्यात जरी विजेचं बिल वाढलं तरीही सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडते. यामुळेच सरकारने पीएम सुर्य घर मोफत वीज योजना सुरु केली आहे. यामुळे वीजबिलाची कोणतीही अडचण येणार नाही. या योजनेत नागरिकांना मोफत वीज दिली जाते.

पीएम नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त कुटुंबियांनी योजनेचा लाभ घेतला आहे. १ कोटी घरांवर हे सोलर पॅनेल बसवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या सरकारी योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पीएम सुर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana)

पीएम सुर्य घर मोफत वीज योजनेत तुम्हाला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. याचसोबत सोलर पॅनेल लावण्यासाठी सरकारकडून ७८००० रुपयांची सब्सिडीदेखील मिळते. त्यामुळे सोलर पॅनेल बसवण्याचा खर्चदेखील कमी होतो.

पीएम सुर्या घर योजनेत तुम्हाला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळते.०-१५० युनिटपर्यंतच्या १-२ किलोवॅट सोलर पॅनेलसाठी ३०-६० हजार रुपये मिळतात. १५०-३०० युनिटच्या वीजेसाठी २-३ किलोवॅटसाठी ६० ते ७८ हजार रुपयांची सब्सिडी मिळते.

अर्ज कसा करावा? (PM Surya Ghar Yojana Application Process)

सर्वात आधी https://pmsuryaghar.gov.in वर जायचे आहे.

यानंतर अप्लाय फॉर रुफटॉप सोलरवर क्लिक करा. यानंतर तुमचे राज्य आणि वीज बिल कंपनीचे नाव लिहा.

यानंतर तुमची सर्व माहिती टाकून रजिस्ट्रेशन करा.

यानंतर तुम्हाला नवीन कंज्युमर नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे.

यानंतर तुम्हाला आरटीएस पॅनेलसाठी अर्ज करायचा आहे. यानंतर तुम्हाला अप्रुवल मिळेल.

यानंतर DISCOM वर रजिस्टर करा आणि प्लांट इन्स्टॉल करा.

यानंतर तुम्हाला प्लांटची सर्व माहिती मीटरसाठी अर्ज करायचा आहे.

मीटर इनस्टॉल झाल्यावर तुम्हाला DISCOM कमिशनिंग सर्टिफिकेट मिळणार आहे.

हे तुम्ही पोर्टलवर द्यायचे आहे. याचसोबत बँक खात्याची माहिती आणि कॅन्सल चेक द्यायचा आहे. या अकाउंटवर सब्सिडी जमा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: सिल्क साडीवर कोणते मंगळसूत्र शोभून दिसेल? पाहा लेटेस्ट डिझाईन

Walking tips: नव्या वर्षात दररोज 10 हजार पावलं चालण्याचा संकल्प केलाय? या ५ सोप्या टीप्सने पूर्ण करा रोजचा काऊंट

भाजपने तिकीट नाकारलं, महिला उमेदवाराच्या आईला ह्रदयविकाराचा झटका|VIDEO

Mithila Palkar: बोलके डोळे अन् मखमली हास्य, अभिनेत्री मिथिलाचं सौंदर्य काळजाचं झालं पाणी पाणी

नववर्षाच्या स्वागतात अडथळा! स्विगी- झोमॅटो अन् अ‍ॅमेझॉनची डिलिव्हरी सर्व्हिस बंद; मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांना फटका, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT