केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. सरकारने नागरिकांसाठी मोफत वीज मिळवून देण्यासाठी नवीन योजना सुरु केली आहे. सरकारने पीएम सुर्य घर मोफत वीज योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. या योजनेत घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवण्यासाठी सरकार सबसिडी देते. या योजनेअंतर्गत आतपर्यंत लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. (PM Surya Ghar Yojana)
पीएम सुर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत तुम्हाला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे वीज बिल कमी येते. सोलर रुफटॉप बसवण्यासाठी सरकार ७८ हजारांपर्यंत सब्सिडी देते. या सब्सिडीचे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. दरम्यान, आता हे पैसे ७ दिवसांच्या आत तुमच्या अकाउंटला जमा केले जातात.
या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सोलर पॅनल बसवण्यावर सरकारचा भर आहे. २ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवायचे असेल तर ३० हजार रुपये प्रति किलोवॅटप्रमाणे पैसे दिले जातात. ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपये दिले जातात. (Government Scheme)
पीएम सुर्य घर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर रुफटॉप सोलरवर जाऊन अर्ज करा.
यानंतर तुम्हाला राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागणार आहे.
यानंतर सोलर रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा.Discom कडून मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांसाठी प्लांट स्थापित करु शकतात.
यानंतर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर कमिशनिंग रिपोर्ट सबमिट करा. यानंतर ७ दिवसातच सब्सिडी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.