Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: सरकारची भन्नाट योजना! फक्त २ रुपयांचा प्रिमियम भरा अन् २ लाखांचा इन्शुरन्स मिळवा

PM Suraksha Vima Yojana: केंद्र सरकारने नागरिकांसाठी पीएम सुरक्षा विमा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना २० रुपयांचा प्रिमियम भरुन २ लाखांचा विमा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकासाठी आपले आरोग्य खूप महत्त्वाचे असते. जर आपले आरोग्य सुदृढ असेल त आयुष्यात आपण काहीह करु शकतो. परंतु कधी काय होईल याचा सध्याच्या जगात भरवसा नाही. त्यामुळे आपण नेहमी भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. जेणेकरुन आपल्या वाईट काळात हे पैसे आपल्या उपयोगी पडतील.

आयुष्यात कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे आपण इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. परंतु अनेक लोक लाइफ इन्शुरन्स घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही २० रुपयांचा प्रिमियम भरुन २ लाखांचा इन्शुरन्स घेऊ शकतात. (Government Scheme)

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम सुरक्षा विमा योजना.२०१५ साली केंद्र सरकारने ही योजना सुरु केली होती.या योजनेत तुम्हाला २ लाखांपर्यंत इन्शुरन्स दिला जातो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत१८ ते ७० वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. जर कोणत्याही अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होते. तेव्हा त्याला २ लाख रुपये दिले जातात. जर एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आले तर त्याला १ लाख रुपये दिले जातात. तुम्ही फक्त या योजनेत २० रुपये प्रिमियम भरुन विमा मिळवू शकतात. (PM Suraksha Vima Yojana)

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने https://www.jansuraksha.gov.in/या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cucumber Water: झटपट वजन कमी करायच? काकडीचे पाणी प्या!

Ahmedpur Vidhan Sabha : अहमदपूरमध्ये महायुतीत बिघाडी; माजी आमदार खंदाडे अपक्ष उतरणार रिंगणात

Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?' दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल

Prajakta Mali: 'मदन मंजिरी, सुबक ठेंगणी...' जवळच्या मैत्रिणींने सांगितला 'फुलवंतीचा' १२ वर्षाचा प्रवास

Diwali: दिवाळीला सर्वात सुंदर दिसायचंय? या सोप्या टीप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT