Viksit Bharat Rozgar Yojana Narendra Modi x
बिझनेस

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Narendra Modi : पंतप्रधान मोदी साडेतीन कोटी तरुणांना 15 हजार रुपये देणार आहेत.. मात्र पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना काय आहे? या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ठरणार? पाहूयात.

Bharat Mohalkar

Viksit Bharat Rozgar Yojana News : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी तरुणांना मोठं गिफ्ट दिलंय...देशातील साडेतीन कोटी फ्रेशर्स तरुणांना पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेतून खासगी क्षेत्रातील पहिली नोकरी जॉईन केल्यानंतर 15 हजार रुपये देण्याची घोषणा लाल किल्ल्यावरुन केलीय...

देशात बेरोजगारीचा दर 6 टक्क्यांच्या जवळ पोहचला. तरुणांच्या हाताला रोजगार नसल्याने विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवलीय.. त्यामुळे मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळावं, यासाठी पंतप्रधान मोदींनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केलीय.. या योजनेचे निकष काय आहेत? पाहूयात...

प्रधानमंत्री विकसित भारत योजनेतून तरुणांना 15 हजार रुपये देण्यात येणार असून त्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत पगाराची मर्यादा घालण्यात आलीय.. तसंच नवोदितांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकार प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 3 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देणार आहे...यासाठी तब्बल 99 हजार 446 कोटी रुपयांची तरतूद केलीय.. या योजनेतंर्गत 2027 पर्यंत साडेतीन लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य ठेवलंय..या योजनेनुसार 1 कोटी 92 लाख तरुणांना पहिल्यांदा लाभ मिळणार असून ही योजना 1 ऑगस्टपासून नोकरी करणाऱ्यांना लागू होणार आहे...

खरंतर फ्रेशर्सनी नोकरी जॉईन केल्यानंतर या योजनेसाठी कुठल्याही कार्यालयात नोंदणी करण्याची गरजच नाही... कारण नोकरी जॉईन केली की EPFO मध्ये कर्मचाऱ्याची नोंदणी होईल. आणि त्यानुसार सहा महिन्यांनी पहिला हप्ता आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता मिळून 15 हजार रुपये खात्यात जमा होतील . महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ष पुर्ण होण्याआधीच कंपनी बदलली तरी दुसऱ्या कंपनीत वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण भत्ता मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनी मोदींनी केलेल्या घोषणेमुळे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला उभारी मिळणार का? तसंच देशातील अंदाजे 7 कोटी बेरोजगारांपैकी केवळ साडेतीन कोटी तरुणांनाच भत्ता मिळणार असेल तर इतर तरुणांच्या रोजगाराचं आणि भविष्याचं काय? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT