PM Mudra Yojana Saam Tv
बिझनेस

PM Mudra Yojana: सरकारची जबरदस्त योजना! व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार २० लाखांचे लोन; पात्रता काय? वाचा

PM Mudra Yojana for Business Get 20 Lakh Loan: पीएम मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी २० लाखांचे लोन दिले जाते. २०१५ मध्ये ही योजना सुरु केली होती.

Siddhi Hande

पीएम मुद्रा योजना

व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार २० लाखांचे लोन

४ कॅटेगरीत दिले जाते लोन

बिझनेस सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा पुरेसे भांडवल नसल्याने तुम्ही बिझनेस सुरु करु शकत नाही. कोणत्याही बँकेतून लोन घेणे शक्य होत वाही कारण त्याचे व्याजदर खूप जास्त असते. त्यामुळेच सरकारने एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला २० लाखांपर्यंतचे लोन मिळते. केंद्र सरकारने व्यवसाय सुरु करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.

पीएम मुद्रा योजनेत लहान व्यापाऱ्यांना लोन दिले जाते. या योजनेत मिळणाऱ्या रक्कमेची मर्यादा डबल करण्यात आली आहे. या योजनेत आता २० लाखांचे लोन मिळणार आहे.

२० लाखांचे लोन मिळणार (PM Mudra Yojana Get 20 Lakh Loan)

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२४-२५ मध्येच याबाबत घोषणा केली होती. पीएम किसान योजनेत लोनची लिमिट २० लाख रुपये केली आहे. याआधी ही लिमिट १० लाखांपर्यंत होती. यामध्ये आता एक तरुण प्लस ही कॅटेगरी अपडेट केली आहे.

पीएम मुद्रा योजना २०१५ मध्ये सुरु केली आहे. स्टार्टअप सुरु करण्यासाठी देशातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करु शकतात. या योजनेत नॉन कॉर्पोरेट आणि नॉन अॅग्रीकल्चर बिझनेस सुरु करण्यासाठी लोन दिले जाते.

४ कॅटेगरीत मिळते लोन

या योजनेत शिशु लोनअंतर्गत ५० लाखांचे लोन मिळते. किशोर लोनमध्ये ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत लोन मिळते. तरुण लोनअंतर्गत ५ ते १० लाखांचे लोन दिले जाते. तरुण प्लस कॅटेगरीसाठी तुम्हाला १० ते २० लाखांपर्यंत लोन दिले जाते. जर व्यवसायिकांनी १० लाखांपर्यंतचे लोन फेडले तर त्यांना २० लाखांपर्यंत लोन दिले जाते.

सरकारच्या या योजनेत शिशु लोनसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. याचसोबत कोणताही प्रोसेसिंग चार्ज लागणार नाही. या सरकारी योजनेत ९ ते १२ टक्के व्याजदर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT