Loan  Saam tv
बिझनेस

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

PM Mudra Yojana Guarantee Free Loan: स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देते. कोणत्याही गॅरंटीशिवाय २० लाखांचे कर्ज दिले जाते.

Siddhi Hande

पीएम मुद्रा योजना

तरुणांना मिळणार २० लाखांपर्यंतचे कर्ज

स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज

अनेक तरुणांचे स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकदा पुरेसं भांडवल नसल्याचे व्यवसाय सुरु करता येत नाही. याच तरुणांना सरकार आता आर्थिक मदत करणार आहे. सरकारने पीएम मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना २० लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना २० लाखांचे लोन मिळणार आहे. पीएम मुद्रा योजनेत याआधी १० लाखांपर्यंतचे लोन मिळत होते. मात्र, ही लिमिट वाढवण्यात आली आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात पीएम मुद्रा योजनेची लिमिट १० लाखांवरुन २० लाख करण्याची घोषणा केली आहे. या योजनेत तरुण प्लस कॅटेगरीदेखील जोडली गेली आहे.

पीएम मुद्रा योजनेत ४ टप्प्यांमध्ये लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन, तरुण लोन आणि तरुण प्लस लोन. शिशु लोनमध्ये ५०,००० रुपये दिले जातात. किशोर लोनअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. तरुण लोनअंतर्गत ५ ते १० लाख रुपये दिले जातात. आता नवीन तरुण कॅटेगरीत १० ते २० लाखांपर्यंत लोन दिले जाते.

पीएम मुद्रा योजनेत तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन मिळणार आहे. शिशु लोनसाठी तुम्हाला कोणत्याही गॅरेंटीची किंवा प्रोसेसिंग चार्जची गरज नाही. जर तुम्हाला २० लाखांचे लोन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आधी तरुण लोन फेडले पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला २० लाखांचे कर्ज दिले जाते.

आवश्यक कागदपत्र

पीएम मुद्रा योजनेत १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, बिझनेस प्लान, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे लागणार आहेत. तुम्ही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करु शकतात. याबाबत अधिक माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT