Home loan tips: होम लोन घेण्यापूर्वी या बाबींचा विचार नक्की करा

Surabhi Jayashree Jagdish

घर खरेदी

घर घेण्यासाठी घेतलेला होम लोन मोठा निर्णय असतो. याचा परिणाम अनेक वर्षे तुमच्या आर्थिक स्थितीवर होत राहतो. म्हणून हा निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे.

home loan tips

प्लॅनिंग आवश्यक

घर घेण्याआधी सर्व माहिती नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य नियोजन केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतात. घाईत घेतलेले निर्णय पुढे त्रासदायक ठरू शकतात.

house buying guide

उत्पन्न आणि खर्च

तुमचा महिन्याचा पगार आणि खर्च नीट मोजून पाहा. EMI तुमच्या उत्पन्नाच्या 30-40% पेक्षा जास्त नसावा. यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही.

property investment tips

चांगला क्रेडिट स्कोर

लोन मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. चांगला स्कोर असेल तर कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. यामुळे एकूण परतफेडीचा भार कमी होतो.

home loan planning

क्रेडिट स्कोर किती असावा?

750 किंवा त्याहून अधिक स्कोर असल्यास लोन मिळण्याची शक्यता वाढते. यामुले बँकांचा तुमच्यावर विश्वास वाढतो. यामुळे लोन मिळण्याची प्रक्रिया सोपी होते.

EMI calculation tips

बँकांच्या व्याजदरांची तुलना करा

प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात. यावेळी सर्व पर्याय तपासून योग्य बँक निवडणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला दीर्घकालीन बचत करता येते.

credit score importance

प्रोसेसिंग फी

लोन घेताना प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क तपासा. प्रीपेमेंट आणि फोर क्लोजरचे नियम आधी वाचा. यामुळे पुढे अनपेक्षित खर्च टाळता येतात.

housing loan advice

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

traditional Indian cooking spices
येथे क्लिक करा