PM Mudra Scheme Saam Tv
बिझनेस

PM Mudra Scheme: दिवाळीत व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय २० लाखांपर्यंत लोन; कसं ते घ्या जाणून

PM Mudra Loan Scheme: केंद्र सरकारने नागरिकांना व्यवासाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत नागरिकांना २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

Siddhi Hande

सध्या सगळीकडे दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या मूहूर्तावर तुम्ही लहान व्यवसाय सुरु करु शकतात.त्यात फटाके, मिठाई आणि पणत्या अशा लहान व्यवसायांना समावेश आहे. हा बिझनेस सुरु करण्यासाठी सुरुवातीला भांडवल खूप गरजेचे असते. यासाठी तुम्हाला लोन घ्यावे लागेल. स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार तुम्हाला भांडवल देते. पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेऊ शकतात.

पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्ही २० लाखांपर्यंत लोन घेऊ शकतात. याआधी फक्त १० लाखांपर्यंत लोन मिळायचे. परंतु आता या लोनची रक्कम वाढवण्यात आली आहे. (PM Mudra Loan Scheme)

पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत देशातील लहान व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते. नॉन-अॅग्रीकल्चर सेक्शनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत आता तुम्ही २० लाखांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत ३ कॅटेगरीमध्ये लोन दिले जाते.

शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन या तीन कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोनमध्ये ५० हजार रुपये लोन दिले जाते. ५० हजार रुपयांमध्ये तुम्ही लहान व्यवसाय सुरु करु शकतात. त्यानंतर किशोर लोनमध्ये ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन दिले जाते. तसेच तरुण लोन या कॅटेगरीत ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

या योजनेत तुम्हाला ९ ते १२ टक्के व्याजदर द्यावे लागतात. या योजनेत ९ ते १२ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत लहान दुकानदर,फूड प्रोसेसिंग युनिट असे लहान व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Price : कांद्याला मिळतोय ४५ रुपये प्रति किलो दर; बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक

Government Job: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती; पगार १,६३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Vastu Tips: दिवाळीच्या दिवसात घरात सुख समृद्धी येण्यासाठी 'या' वास्तु टिप्स फॅालो करा

Bigg Boss 18 : कन्फेशन रूममध्ये मोठा खुलासा! बिग बॉसने ईशाला दाखवला रजतचा खरा चेहरा

IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा 'फुसका बार'; ऋतुराज 'गोल्डन डक', अख्खा संघ 107 धावांवर तंबूत

SCROLL FOR NEXT