Vande Bharat saam Tv
बिझनेस

Vande Bharat: आनंदाची बातमी! एक नाही तर तीन वंदे भारत ट्रेन लाँन्च होणार; जाणून घ्या तारीख,मार्ग अन् थांबे

Vande Bharat, Indian Railways: पंतप्रधान मोदी ज्या तीन वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत. त्या तीन ट्रेन नागपूर अजनी ते पुणे, बेंगळुरू-बेलगाव आणि अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान चालवली जाणार आहेत.

Bharat Jadhav

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन नवीन वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत.

  • नागपूर-अजनी ते पुणे, बेंगळुरू-बेलगावी आणि अमृतसर-कटरा हे तीन मार्ग निश्चित.

  • तिकीट दर, थांबे व वेळापत्रक लवकरच IRCTC वर उपलब्ध होणार.

  • वंदे भारतमुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे.

देशभरातील सर्व राज्यांमध्ये आता वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या ट्रेनमुळे प्रवास आरामदायी होतो. यासह ट्रेनमध्ये सर्व सुविधा चांगल्या प्रकारे मिळतात. त्यामुळे प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात ह्या ट्रेन सुरू करण्यात येत आहे. आता भारत रेल्वे विभागाने प्रवाशांना खुशखबर दिलीय. देशातील तीन नव्या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान मोदी हे स्वतः या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान ज्या तीन नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार आहेत. यात बेंगळुरू-बेळगावी वंदे भारत, याशिवाय नागपूरमधील अजनी ते पुणे आणि अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा पर्यंत वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिलीय. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पोस्ट मध्ये म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या रविवारी आपल्या कर्नाटक दौऱ्यावेळी तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

या नव्या वंदे भारत ट्रेन बेंगळुरू-बेळगावी, नागपूरच्या अजनी ते पुणे आणि अमृतसर-श्री माता वैष्णोदेवी देवी कटरादरम्यान धावतील. बेंगळुरू-बेळगावी ट्रेन सकाळी ५.२० वाजता बेलगावीहून रवाना होईल, आणि दुपारी १.५० वाजेपर्यंत बेंगळुरूला पोहचतील. त्याचप्रमाणे बेंगळुरूहून ही ट्रेन दुपारी २.२० वाजता आपला प्रवास सुरू करेल आणि रात्री १.४० वाजता बेळगावला पोहोचेल. या ट्रेनमुळे बेंगळुरू, तुमकुरू, दावणगिरे, हावेरी, हुबली, धारवाड आणि आणि बेळगाव मधील दळवळण वाढले.

तर अजनी-पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेनमुळे आठ शहरामधील दळवळण वाढणार आहे. या मार्गावर मध्यम गतीची वंदे भारत ट्रेन धावणार आहे. वर्धा, भंडारा, अकोला, जळगाव, मनमाड आणि दौंड या शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन स्टॉप घेईल. या ट्रेनमध्ये आधुनिक स्लीपर कोच आणि सुधारित सुविधा देण्यात आल्यात. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देते. अजनी-पुणे वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ कमी होईलय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क सुधारेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT