PM Matritva Vandana Yojana Saam Tv
बिझनेस

PM Matru Vandana Yojana: केंद्र सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतायत ६००० रुपये; अर्ज कुठे करावा?

PM Matru Vandana Yojana: केंद्र सरकारने महिलांसाठी खास मातृ वंदना योजना राबवली आहे. या योजनेत गरोदर महिलांना ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळते. केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेही अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे पीएम मातृ वंदना योजना. या योजनेत गरोदर महिलांना आर्थिक मदत दिली जाते.

गर्भवती महिलांना उत्तम पोषण मिळावे, त्यांचे आरोग्य सृदृढ राहावे, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहेत. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्कमता समाजामध्ये निर्माण व्हावी, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत ही योजना राबवली जाते. या योजनेत २०२५-२६ मध्ये ५ लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा.

मातृ वंदना योजनेत किती पैसे मिळतात?

मातृ वंदना योजनेत महिलांना टप्प्याटप्प्याने मदत केली जाते. पहिल्या अपत्यासाठी तुम्हाला ५००० रुपये दिले जातात. गर्भधारणा नोंदणी झाल्यानंतर सहा महिन्याच्या प्रसूतीपूर्वी ३००० रुपये दिले जातात. बाळाच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर १४ आठवड्यापर्यंत २००० रुपये मिळतात. त्याआधी बाळाला लस द्यावी लागते. जेव्हा दुसऱ्या बाळाचा जन्म होतो तेव्हा ६००० रुपयांची मदत दिली जाते.ही रक्कम एकत्रितपणे दिली जाते.

पात्रता (PM Matru Vandana Yojana Eligibility)

महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.

अनुसूचित जाती जमातीमधील महिला

बीपीएल रेशन कार्डधारक

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी महिला

ई-श्रम कार्डधारक महिला

मनरेगा योजनेच्या लाभार्थी

अंगणवाडी सेविका, मदतनीस

अर्ज कसा करावा?

पीएम मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधायचा आहे. तुम्ही तुमच्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिनी लढाऊ विमानांच्या तैवानवर घिरट्या; इराण-अमेरिकेनंतर आता चीन-तैवानमध्ये युद्ध?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र धर्म वाढवूया,मराठीची गुढी उंच उभी करुया- देवेंद्र फडणवीसांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Luxurious Train : WiFi-TV ते लग्जरी रुम; 'या' ट्रेनमध्ये मिळतात 5-स्टार हॉटेलसारख्या सुविधा, एकदा तुम्ही प्रवास कराच

Ladki Bahin Yojana: मार्च पण संपत आला, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Dhurandhar 2 : बडे साहेबांना पाहून बसेल 440 होल्टचा धक्का, चाहते म्हणाले- हे तर मरे साहब| VIDEO

SCROLL FOR NEXT