PM Matru Vandana Yojana Saam Tv
बिझनेस

PM Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ₹११०००; सरकारची पीएम मातृ वंदना योजना आहे तरी काय?

PM Matru Vandana Yojana Benefit: केंद्र सरकारने पीएम मातृ वंदना योजना राबवली आहे. या योजनेत गर्भवती महिलांना आर्थिक मदत केली जाते. पहिल्या अपत्यासाठी ५००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

पीए मातृ वंदना योजना

गर्भवती महिलांना मिळतात ११,००० रुपये

पहिल्या अपत्यासाठी ५००० रुपये

दुसरे अपत्य मुलगी असल्यास ६००० रुपये मिळतात

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना राबवली आहे. या योजनेत गरोदर महिलांना आर्थिक मदत केली जाते. गर्भवती महिलांना दिलासा मिळावा, त्यांना चांगले पोषण मिळावे, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत आता पुणे जिल्हापरिषदेत नवीन ३२ हजार ६४६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

गरोदर महिलांना मिळतात ६ हजार रुपये (Pregnant Women Get 6000 Rupees Under PM Matru Vandana Yojana)

गरोदर महिलांना या योजनेत पहिल्या मुलासाठी ५००० रुपये तर दुसऱ्या मुलासाठी ६ हजार रुपये मिळतात. पहिल्या अपत्यासाठी गरोदरपणाची नोंदणी केल्यावर ३००० रुपये, बाळाच्या जन्माची नोंदणी केल्यावर २ हजार रुपये दिले जाते. दुसऱ्या मुलासाठी (फक्त मुलगी असल्यास) गरोदरपणाची नोंदणी अनिवार्य आहे. दुसऱ्या अपत्यावेळी बाळाचे जन्मप्रमाणपत्र सादर केल्यास ६ हजार रुपयांचा लाभ मिळतो. योजनेचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा केला जातो. यासाठी अंगणवाडी सेविकेला प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रति लाभार्थी २५० रुपये दिले जातात.

पात्रता काय? (PM Matru Vandana Yojana Eligibility)

१८ ते ५५ वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. पहिले अपत्य मुलगा असो किंवा मुलगी तुम्हाला लाभ दिला जातो. दुसऱ्या अपत्य फक्त मुलगी असेल तरच लाभ दिला जातो. या योजनेत राज्य सरकारी, सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला, ४० टक्के व अधिक अपंगत्व असणा-या (दिव्यांग जन) महिला, बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला, आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत महिला लाभार्थी, ई-श्रम कार्डधारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक महिला, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत रेशनकार्डधारक महिला लाभार्थी पात्र आहे.

अर्ज कसा करावा? (PM Matru Vandana Yojana Application Process)

पीएम मातृ वंदना योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्र जमा करावे.तसेच लाभार्थी स्वतः www.pmmvy.wcd.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT