शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदतीची गरज असते. केंद्र सरकार नेहमीच त्यांना मदत करतं. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरु करतं. ज्याने शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत. त्यातच प्रसिद्ध असणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan Yojana ) याचे एकूण २२ हप्ते शेतकऱ्यांनी घेतले आहेत.
शेतकऱ्यांना आता २३वा हप्ता कधी येणार? याची चिंता आहे. यामध्ये शेतकऱ्यांना २-२ हजारांचा लाभ मिळणार आहे. हे पैसे थेट बॅंक खात्यात जमा केले जातात. पण हे पैसे किती तारखेला मिळणार याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाहीये. पुढील माहितीत आपण पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता कधी येणार हे जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना मागचा हप्ता हा १३ मार्च २०२६ रोजी आला. हा २२ वा हप्ता होता. त्यामध्ये ९ कोटींहून जास्त पात्र शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळाला. त्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला.
पीएक किसान योजनेच्या हप्त्याची अद्याप वेळ ठरलेली नाही. त्यामध्ये हा हप्ता नेमका किती तारखेला येणार हे सांगणं कठीण आहे. जर या योजनेचा लाभ ४ महिन्यांच्या अंतराने दिला जात असेल तर तेव्हा तुम्हाला लाभ घेता येईल. म्हणजेच २२ वा हप्ता हा १३ मार्चला खात्यात जमा झाला असेल, तर अंदाजे २३ वा हप्ता हा पुढे चार महिन्यांनी खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच जूनपर्यंत हा हप्ता मिळेल असा अंदाज आपण बांधू शकतो. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.